मुंबई - भारतीय संघाचा माजी स्फोटक सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागच्या मते, महेंद्रसिंग धोनीला टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा मेंटॉर म्हणून निवडण्याचा निर्णय फायद्याचा ठरेल. सेहवाग म्हणाला की, धोनी व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये नेहमी गोलंदाजांचा कर्णधार राहिला आहे. अशात तो संघात राहिल्याने जसप्रीत बुमराह आणि इतर गोलंदाजांना खूप मदत मिळेल.
विरेंद्र सेहवागने पीटीआयशी बोलताना सांगितलं की, महेंद्रसिंग धोनीने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा मेंटॉरसाठीचा प्रस्तावाचा स्वीकार केला, यामुळे मी खूप खुश आहे. चाहत्यांची इच्छा आहे की धोनी पुन्हा भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा परतला आणि मेंटॉरच्या रुपाने तो संघासोबत आहे.
एक दशक धोनीसोबत खेळलेल्या विरेंद्र सेहवाग कल्पना आहे की, धोनीकडे एक कर्णधार म्हणून काय प्रतिभा आहे. तो लिमिटेड षटकाच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजीविषयी खूप विचार करतो.
कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे खेळाडू असतात. जे कर्णधारासाठी बोलताना संकोचतात. पण धोनी असा माणूस आहे ज्याच्यापर्यंत सहजपणे पोहचता येते. तो युवा खेळाडूंसाठी सर्वात चांगला संकटमोचक आहे, असे देखील विरेंद्र सेहवाग म्हणाला.
बीसीसीआयने तीन राखीव खेळाडूंसह 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. तर विरेंद्र सेहवागचे मते, आयसीसीने 10 ऑक्टोबरपर्यंत संघ बदलण्यासाठी वेळ दिला आहे. यामुळे आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला अखेरच्या क्षणी संघात स्थान मिळू शकते.
हेही वाचा - विराट कोहलीच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर कपिल देव नाराज, म्हणाले...
हेही वाचा - IPL 2021 : वानिंदु हसरंगा आणि दुश्मंता चमीराबाबत विराट कोहलीची मोठी प्रतिक्रिया