ETV Bharat / sports

IPL 2022 Updates : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात 'मिस्टर आयपीएल' दिसणार 'या' नव्या भूमिकेत - Fifteenth season of IPL

आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात सुरेश रैना हा अनसोल्ड ( Suresh Raina remained unsold ) राहिला होता. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी त्याच्यासाठी ट्विटर एक मोहिम चावली होती. तरी देखील त्याला कोणत्या संघांनी घेतले नाही. परंतु आता आयपीएल स्पर्धेत सहभागी होणार असून तो नवीन भूमिकेत दिसणार आहे.

Suresh Raina
Suresh Raina
author img

By

Published : Mar 16, 2022, 5:48 PM IST

हैदराबाद : आयपीएल 2022 ( IPL 2022 ) या हंगामाला 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या अगोदर पंधराव्या हंगामाचा लिलाव बंगळुरु येथे पार पडला. या लिलानात मिस्टर आयपीएल म्हणजेच सुरेश रैना अनसोल्ड राहिला ( Suresh Raina remained unsold ) होता. त्यामुळे रैनाच्या चाहत्यांनी चेन्नई आणि लखनऊ संघांवार कडाडून टीका केली होती. आता या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सुरेश रैना आयपीएल 2022 च्या हंगामात सहभागी होणार आहे. परंतु आता सुरेश रैना एका नव्या भूमिकेतून समोर येणार आहे.

दैनिक जागरण सोबत चर्चा करताना डिजनी प्लस हॉटस्टारचे संजोग गुप्ता ( Sanjog Gupta of Disney Plus Hotstar ) म्हणाले, यंदा आयपीएल स्पर्धेत सुरेश रैना खेळणार नाही. त्यामुळे आम्हाला त्याला कोणत्या ना कोणत्या भूमिकेने त्याला आयपीएल सोबत जोडून ठेवायचे होते. एकेकाळी तो आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. तसेच त्याला मिस्टर आयपीएल ( Mr. IPL ) म्हणून ओळखले जात होते. तो यंदा आयपीएल स्पर्धेत हिंदी कॉमेंट्री करताना दिसून येणार आहे. त्याच्याबरोबर भारतीय संघाचे माजी कोच रवि शास्री ( Former coach Ravi Shastri ) देखील कॉमेंट्री करताना दिसून येणार आहेत. मुंबईची बोली त्याच्या हिंदीतून दिसून येते, म्हणून ते आमच्या हिंदी शिक्षकाकडून झूमचे वर्ग घेत आहेत आणि त्यांना नोट्सही पाठवल्या आहेत, असे संजोग गुप्ता म्हणाले.

सुरेश रैनाला हिंदी कॉमेंट्रीमध्ये ( Suresh Raina Hindi Commentator ) कोणतीही अडचण येणार नाही. तो उत्तर भारतातून येतो. रैना आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात लायन्सकडून खेळला आहे. यावेळी लिलावात त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. म्हणून त्याच्या चाहत्यांनी ट्विटरवर मोहिम चालवली होती. ज्यामध्ये त्याला कोणत्याही संघात स्थान देण्याची मागणी करत होते. तरी त्याचा काहीही परिणाम झाला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.