नवी दिल्ली : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीची जबरदस्त कामगिरी केली आहे. बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शमीने फलंदाजी करताना कांगारू गोलंदाजांचे षटकार खेचले. शमीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई करताना 47 चेंडूत 37 धावा केल्या. शमीने या खेळीत 2 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत मोहम्मद शमीने विराट कोहली, युवराज सिंग आणि केए राहुलसह अनेक भारतीय दिग्गजांना मागे टाकले आहे. नागपुरात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात शमीने 25 षटकार पूर्ण केले आहेत.
-
Only 15 batters from India have more Test sixes than Mohammed Shami.
— Wisden India (@WisdenIndia) February 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
What a fun batter to watch. 🔥#INDvAUS pic.twitter.com/iyhnYHzL5d
">Only 15 batters from India have more Test sixes than Mohammed Shami.
— Wisden India (@WisdenIndia) February 11, 2023
What a fun batter to watch. 🔥#INDvAUS pic.twitter.com/iyhnYHzL5dOnly 15 batters from India have more Test sixes than Mohammed Shami.
— Wisden India (@WisdenIndia) February 11, 2023
What a fun batter to watch. 🔥#INDvAUS pic.twitter.com/iyhnYHzL5d
कसोटी क्रिकेटमध्ये 722 धावा : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कसोटी क्रिकेटमध्ये 722 धावा केल्या आहेत. शमीने 61 कसोटी सामन्यांच्या डावात 25 षटकार पूर्ण केले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपुरात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात मोहम्मद शमीने अपेक्षित नसलेला पराक्रम करून आपली बॅट दाखवली. पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शमीने झंझावाती खेळी खेळताना 40 चेंडूत 37 धावा केल्या. शमीची ही धावसंख्या ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 9 खेळाडूंपेक्षा जास्त आहे. या खेळीनंतर शमी कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारा 16 वा भारतीय खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीने 178 कसोटी डावांमध्ये 24 षटकार मारले आहेत. त्याचवेळी शमीने 61 सामन्यांच्या 85 व्या डावात 25 षटकार ठोकले आहेत. कोहलीशिवाय शमीने माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, युवराज सिंग यांच्यासह अनेक दिग्गजांना पराभूत केले आहे.
माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना टाकले मागे : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी टीम इंडियासाठी 164 कसोटी सामन्यांमध्ये 13,288 धावा केल्या आहेत. राहुल द्रविडने कसोटी फॉर्मेटमध्ये 36 शतके आणि 63 अर्धशतके केली आहेत. या कसोटी क्रिकेटमध्ये राहुल द्रविडच्या नावावर फक्त २१ षटकार आहेत. त्याच वेळी, त्याने 344 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10,889 धावा केल्या आणि त्यात 12 शतके झळकावली. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कसोटी फॉरमॅटमध्ये फलंदाजी करताना केवळ 772 धावा केल्या आहेत. मात्र, या फॉरमॅटमध्ये मोहम्मद शमीने 23 षटकार ठोकले आहेत.
मोहम्मद शमी टीम इंडियाचा 16 वा खेळाडू ठरला
- मोहम्मद शमी - 25 षटकार
- विराट कोहली - 24 षटकार
- युवराज सिंग - २१ षटकार
- राहुल द्रविड - 21 षटकार
- केएल राहुल - १७ षटकार
- चेतेश्वर पुजारा - 15 षटकार
हेही वाचा : Mohammed Shami : मोहम्मद शमीने षटकार ठोकण्यात राहुल द्रविडलासुद्धा टाकले मागे; नवीन विक्रम केला नावावर