ETV Bharat / sports

मोहम्मद शमी निवृत्तीनंतर काय करणार? जाणून घ्या

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडलेड कसोटी सामन्यात शमीला दुखापत झाली होती. यामुळे नंतर तो ७ कसोटी सामन्याला मुकला. याविषयावरून तो म्हणाला, मी नेहमी क्रिकेट खेळू शकत नाही. या कारणाने मी युवा खेळाडूंना मार्गदर्शन करू इच्छित आहे, असेही शमीने सांगितलं.

mohammed-shami-makes-it-clear-what-he-will-do-after-being-retired
मोहम्मद शमी निवृत्तीनंतर काय करणार? जाणून घ्या
author img

By

Published : May 17, 2021, 8:24 PM IST

मुंबई - भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो काय करणार आहे? याबद्दलची माहिती दिली आहे.

एका माध्यमाशी बोलताना शमी म्हणाला, पाहा, आताच काही योजना आखणे उचित होणार नाही. कारण काही बाबी आपल्या हातात राहत नाहीत. कोणी विचार केला होता का?, कोरोनामुळे आपल्या जीवनातील दोन वर्ष खराब होती. यामुळे मी एका वेळेस एका मालिकेवर किंवा एका स्पर्धेवर लक्ष्य केंद्रित करत आहे.

आम्ही शानदार खेळ केला आहे. यामुळे इंग्लंड दौऱ्याआधी आमचा आत्मविश्वास वाढलेला आहे, असेही शमीने सांगितलं. आतापर्यंत ५० कसोटी सामन्यात १८० विकेट घेणाऱ्या शमीने पुढे सांगितलं की, जर आम्ही मागील ६ महिन्यातील लय पुन्हा दाखवण्यास यशस्वी ठरलो तर मला पूर्ण विश्वास आहे की, हा दौरा आमच्यासाठी शानदार ठरेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडलेड कसोटी सामन्यात शमीला दुखापत झाली होती. यामुळे नंतर तो ७ कसोटी सामन्याला मुकला. याविषयावरून तो म्हणाला, मी नेहमी क्रिकेट खेळू शकत नाही. या कारणाने मी युवा खेळाडूंना मार्गदर्शन करू इच्छित आहे, असेही शमीने सांगितलं.

हेही वाचा - 'जहीर खानचे व्हिडिओ पाहून बेसिक गोलंदाजी शिकलो'

हेही वाचा - कोरोनाग्रस्त आई-वडिलांच्या उपचारासाठी क्रिकेटरकडे नव्हते पैसे; ज्वालाने केली मदत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.