ETV Bharat / sports

कार अपघातात 'या' क्रिकेटपटूनं २ जणांचे वाचवले प्राण, सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त केली भावना

Mohammed Shami : मोहम्मद शमीनं आपल्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय. यात तो कार अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला 'प्रथमोपचार' देताना दिसतोय.

Mohammed Shami
Mohammed Shami
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2023, 10:17 AM IST

नैनिताल (उत्तरखंड) Mohammed Shami : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या डोळ्यादेखल शनिवारी एक कार अपघात झाला. या अपघातात एक कार टेकडीवरुन खाली कोसळली. हे पाहून मोहम्मद शमी तातडीनं मदतीसाठी पोहोचला. यावेळी त्यानं अपघातानंतर प्रवाशांना वाचविल्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअरही केलाय.

काय म्हटला शमी : शमीनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक कार उलटलेली दिसत आहे. शमीनं इथं पोहोचून जखमी व्यक्तींची माहिती घेताना दिसत आहे. तसंच तो जखमींवर प्राथमिक उपचार करताना दिसत आहे. रस्ता बंद असल्यामुळं कार पलटी होऊनही चालकाला फारशी दुखापत झाली नाही. हा व्हिडिओ शेअर करताना शमीनं लिहिलंय की, 'तो (कारचालक) खूप भाग्यवान होता. देवानं त्याला दुसरं जीवन दिलं. नैनितालच्या हिल रोडवरुन त्याची गाडी माझ्या डोळ्यासमोर पलटी आली. आम्ही अत्यंत काळजीनं त्यांना गाडीतून बाहेर काढलं.' हा व्हिडिओ शेअर करताना शमीनं असंही लिहिलंय की, एखाद्याचा जीव वाचवल्यानंतर खूप आनंदी झाला आहे.

शमी सध्या करतोय सुट्टी साजरी : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या उत्तराखंडमध्ये सुट्ट्याचा आनंद घेत आहे. नुकत्याच झालेल्या 2023 च्या विश्वचषकातील दमदार कामगिरीनंतर तो एका कार्यक्रमासाठी नैनितालहून जात होता. यावेळी प्रवास करत असताना त्यांच्या समोरच हा कार अपघात झाला. 2023 च्या विश्वचषकात तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. विश्वचषकात अवघ्या 7 सामन्यात त्यानं 24 बळी घेतले होते.

शमीनं घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट : भारताचा वेगवानं गोलंदाज मोहम्मद शमी सध्या उत्तराखंडात पर्यटनाचा आनंद लुटत आहे. यादरम्यानं त्यानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली. या भेटीचे फोटो त्यानं आपल्या सोशल मिडियावर शेअर केले आहेत. यावर अनेक मजेशीर प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मोहम्मद शमीला राहुल गांधींच्या पनौती वक्तव्यावर विचारलं असता यावर उत्तर देताना शमी म्हणाला, “यार, हे वादग्रस्त प्रश्न आम्हाला समजत नाहीत. मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, ज्यावर तुम्ही गेले दोन महिने मेहनत केलीय. मला हा राजकीय अजेंडा समजत नाही" असंही शमी म्हणाला.

हेही वाचा :

  1. रडवेल्या भारतीय संघाला मोदींनी घेतलं कवेत; वर्ल्डकप पराभवानंतर ड्रेसिंगरुममध्ये पोहोचले मोदी, शमीची भावनिक पोस्ट
  2. “शमीनं फायनलमध्ये चांगली कामगिरी करावी”, बदरूद्दीन सिद्दीकी यांची ‘ईटीव्ही भारत’शी बातचीत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.