बंगळुरु - भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला त्याची आयपीएल टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने पंधराव्या हंगमासाठी रिटेन केले होते. तो रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने रिटेन केलेल्या खेळाडूंपैकी विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेलनंतर तिसरा खेळाडू आहे. आता या खेळाडूने आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये ( Podcast of Royal Challengers Bangalore ) बोलताना आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
शुक्रवारी आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj spoke in RCB podcast ) म्हणाला, जेव्हा मी सरावासाठी स्टेडियममध्ये जायचो, ''तेव्हा माझ्या कुटुंबाला खूप संघर्ष करावा लागला. माझ्याकडे फक्त प्लॅटिना (मोटारसायकल) होती. बाबा मला पेट्रोलसाठी 60 रुपये द्यायचे. ते पैसे घेऊन मी उप्पल स्टेडियम गाठायचो, जे माझ्या घरापासून खूप दूर होते.''
सिराज पुढे म्हणाला, ''जेव्हा माझी आयपीएलसाठी निवड झाली तेव्हा कुटुंबाची पैशाची समस्या संपली. वडिलांनी ऑटो चालवणे बंद केले, आईने घरकाम करणे बंद केले, आम्ही भाड्याच्या घरात राहणे बंद केले, त्या काळात आम्ही नवीन घर घेतले. मला आयुष्यात दुसरे काही नको आहे. मला फक्त माझ्या आई-वडिलांना आनंदी ठेवायचे होते. आयपीएलने मला प्रसिद्धी दिली ( The IPL made Siraj famous ), अनेक लोकांशी भेटून आणि बोलून मला सामाजिक वर्तुळात कसे राहायचे हे शिकवले. आयपीएलमधून मला खूप काही शिकायला मिळाले.''
-
Not everyone is as lucky as me to be blessed with a elder brother like you. Thank you so much for coming into my life and standing by my side through thick and thin. I hope you get all that you truly deserve. Happy Birthday king 👑 @imVkohli pic.twitter.com/pTn8NBZrHh
— Mohammed Siraj (@mdsirajofficial) November 5, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Not everyone is as lucky as me to be blessed with a elder brother like you. Thank you so much for coming into my life and standing by my side through thick and thin. I hope you get all that you truly deserve. Happy Birthday king 👑 @imVkohli pic.twitter.com/pTn8NBZrHh
— Mohammed Siraj (@mdsirajofficial) November 5, 2021Not everyone is as lucky as me to be blessed with a elder brother like you. Thank you so much for coming into my life and standing by my side through thick and thin. I hope you get all that you truly deserve. Happy Birthday king 👑 @imVkohli pic.twitter.com/pTn8NBZrHh
— Mohammed Siraj (@mdsirajofficial) November 5, 2021
एक किस्सा शेअर करताना, सिराजने एक प्रसंग आठवला जेव्हा आरसीबीचा तत्कालीन कर्णधार विराट कोहली म्हणाला की दुखापतीमुळे तो त्याच्या निवासस्थानी आयोजित डिनर पार्टीला ( Dinner party at Siraj house ) उपस्थित राहू शकणार नाही. मात्र काही मिनिटांनंतर सिराजने कोहलीला कारमधून खाली उतरताना पाहिले आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला.
तो म्हणाला, मी आरसीबी ( Royal Challengers Bangalore ) संघातील सर्व खेळाडूंना माझ्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले होते. हॉटेलमधून थेट घरी आलो. मी विराटला फोन केला असता तो म्हणाला, माझ्या पाठीला दुखापत आहे, मी येऊ शकत नाही. पण, सर्व खेळाडू आल्यावर विराट ही गाडीतून खाली उतरताना दिसला. सर्वजण तिथे होते, पार्थिव पटेल, युझवेंद्र चहल, मला तिथे कोणीही दिसले नाही, मी धावतच विराटकडे गेलो आणि त्याला मिठी मारली. ते माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम सरप्राइज ( The best surprise of Siraj life ) होते.