ETV Bharat / sports

मोहम्मद अझरूद्दीनची अध्यक्षपदावरून उचलबांगडी; कारण आहे गंभीर - मोहम्मद अझहरुद्दीन हैदराबाद क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपद न्यूज

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीनला हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावरुन निलंबित करण्यात आले आहे.

Mohammad Azharuddin Removed as Hyderabad Cricket Association President
मोहम्मद अझरूद्दीनची अध्यक्षपदावरून उचलबांगडी; कारण आहे गंभीर
author img

By

Published : Jun 17, 2021, 3:00 PM IST

हैदराबाद - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीनला हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावरुन निलंबित करण्यात आले आहे. अझहरुद्दीनवर मनमानी निर्णय घेणे, हितसंबंधांची माहिती न देणे आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले असून या प्रकरणी असोसिएशनने अझहरुद्दीनला कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे. या प्रकरणाच्या आरोपाची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत तो अध्यक्षपदावरुन निलंबित असेल. त्याचबरोबर त्याचे सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे.

मोहम्मद अझहरुद्दीन विरुद्ध सदस्यांनी केलेल्या तक्रारीनंतर त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. अझरवर नियमभंग करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याशिवाय अझहरुद्दीन दुबईतील एका क्रिकेट क्लबचा सदस्य देखील आहे. हा क्लब बीसीसीआयने मान्यता न दिलेल्या स्पर्धेत खेळतो. याबाबतची माहिती अझहरुद्दीनने असोसिएशनपासून लपवून ठेवल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.

दरम्यान, अझहरुद्दीन २७ सप्टेंबर २०१९ रोजी एचसीएचा अध्यक्ष बनला. त्यानंतर त्याची कारकिर्द सतत वादग्रस्त ठरली आहे. त्याआधी अझहरुद्दीनवर २००० साली मॅच फिक्सिंगचा आरोप झाला होता. या प्रकरणात त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली. २०१२ मध्ये आंध्र प्रदेश न्यायालयाने ती बंदी उठवली. त्याआधीच अझहरुद्दीनची क्रिकेट कारकिर्द संपली होती. अझहरुद्दीनने भारताकडून ३३४ एकदिवसीय सामने खेळली आहेत. यात त्याने ९ हजार ३७८ धावा केल्या आहेत. तसेच त्याच्या नावे कसोटीत ६ हजार २१५ धावा आहे. यात २२ शतके आणि २१ अर्धशतकांचा समावेश आहे.

हेही वाचा - WTC Final: भारताने ICC कडे केली न्यूझीलंडच्या खेळाडूंची तक्रार; जाणून घ्या कारण

हेही वाचा - WTC Final : न्यूझीलंडला फायदा पण आम्हीही तयार - रहाणे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.