ETV Bharat / sports

MI Vs DC WPL Final : मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर मात करत जिंकली पहिली महिला प्रीमियर लीग ट्रॉफी - दिल्ली कॅपिटल्स

काल महिला प्रीमियर लीग 2023 चा अंतिम सामना हरमनप्रीत कौरच्या मुंबई इंडियन्स आणि मेग लॅनिंगच्या दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळला गेला. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 7 गडी आणि 3 चेंडू राखून पराभव केला. यासह महिला प्रीमियर लीगचे पहिले विजेतेपद मुंबई इंडियन्सच्या नावे झाले आहे.

MI Vs DC WPL Final
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
author img

By

Published : Mar 27, 2023, 6:41 AM IST

मुंबई : मुंबई इंडियन्सने रविवारी येथे झालेल्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सात गडी राखून पराभव करत पहिली महिला प्रीमियर लीग ट्रॉफी जिंकली. मुंबईने प्रथम दिल्लीला 9 बाद 131 धावांवर रोखले आणि नंतर तीन चेंडू शिल्लक असताना विजयी लक्ष्य पूर्ण केले. मुंबईकडून नॅट सायव्हर - ब्रंटने 55 चेंडूंत नाबाद 60 धावा केल्या, तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 39 चेंडूंत 37 धावा केल्या. या दोघींच्या बळावर मुंबईने 19.3 षटकांत 3 बाद 134 धावा करत पहिली महिला प्रीमियर लीग आपल्या नावे केली.

हेली मॅथ्यूजची शानदार गोलंदाजी : तत्पूर्वी, ब्रेबॉर्न स्टेडियमवर नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग (29 चेंडूत 35 धावा) हिने सर्वाधिक धावा केल्या. तर शेफाली वर्मा (11) आणि मारिझान कॅप (18) या दोघींनी दुहेरी धावसंख्या गाठल्या. एका क्षणाला दिल्लीची परिस्थिती 16 षटकांत 9 बाद 79 अशी बिकट झाली होती. मात्र त्यानंतर शिखा पांडे (नाबाद 27) आणि राधा यादव (नाबाद 27) यांनी अवघ्या 24 चेंडूत 52 धावा जोडून दिल्लीला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. मुंबईकडून हेली मॅथ्यूज (4-2-5-3) हिने घातक गोलंदाजी करत दिल्लीचे कंबरडे मोडले. तर इस्सी वोंग (3/42) आणि मेली केर (2/18) ह्यांनी देखील तिची उत्तम साथ दिली.

दोन्ही संघाची प्लेइंग 11 : मुंबई इंडियन्स - हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), हरमनप्रीत कौर (कर्णधार), नताली सिव्हर ब्रंट, अमेलिया कार, हुमैरा काझी, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, जिंतामणी कलिता, इसी वोंग, सायका इशाक ; दिल्ली कॅपिटल्स - मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, अ‍ॅलिस कॅप्सी, मारिजन कॅप, जेमिमाह रॉड्रिग्स, जेस जॉन्सन, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, राधा यादव, मीनू मणी

हे ही वाचा : Women's World Boxing Championship: चीनच्या वांग लीनाचा पराभव करत भारताच्या स्वीटीने जिंकले सुवर्णपदक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.