मुंबई : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये गुरूवारी जोरदार लढत झाली. मुंबई इंडियन्सकडून दिल्ली कॅपिटल्स यांचा 8 गडी राखून पराभव केला. गुरूवारी झालेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या 106 धावांचे आव्हान मुंबई इंडियन्सने 15 षटकांत पार केले. डीवाय पाटील स्टेडीअमवर सामना खेळवला गेला.
खेळाडूंची कामगिरी : सलामीवीर यस्तिका भाटियाने 32 चेंडूत 41 धावांची खेळी केली. त्याआधी हेली मॅथ्यूज (32) रन केल्या. तर कर्णधार हमनप्रीत कौर हीने नाबाद 12 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौर ही मुंबई इंडियन्स संघातील अष्टपैलू खेळाडू आहे. रनांचा पाठलाग करत विजय मिळवला. हेली मॅथ्यूज, इस्सी वोंग आणि सायका इशाक यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. उत्तम कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 18 षटकांत 105 धावांत दिल्ली कॅपिटल्सला गुंडाळले. दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने सर्वाधिक ४३ धावा केल्या. मात्र इतर संघातील खेळांकडून हवे तेवढे सहकार्य मिळाले नाही.
मुंबई इंडियन्स अव्वल स्थानी : दिल्ली कॅपिटल्सवर मिळालेल्या विजयानंतर गुणतालिकेत मुंबई इंडियन्सने अव्वल स्थान मजबूत केले आहे. नाणेफेक जिंकत दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दिल्लीचा डाव 105 धावांवर आटोपला. यास्तिकाने आतापर्यंतच्या स्पर्धेतील तिची सर्वात विश्वासार्ह खेळी खेळली, हार्ड हिटिंग मॅथ्यूजने देखील खराब चेंडूंचा फायदा घेतला. यास्तिकाने आठ चौकार ठोकून डब्ल्यूपीएलमधील तिची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. तर मॅथ्यूजने नाबाद ७७ धावा फटकावताना ३१ चेंडूंत सहा चौकारांसह नाबाद राहिली. मॅथ्यूजने चौथ्या षटकात शिखा पांडेच्या चेंडूवर सलग तीन चौकार लगावले. तारा नॉरिसने नवव्या षटकात दिल्लीला थोडा दिलासा दिला. मॅथ्यू आणि नॅट सायव्हर-ब्रंटची जोडी मुंबईला विजय मिळवून देईल, असे वाटत असताना, दिल्लीची उपकर्णधार जेमिमाह रॉड्रिग्सने लाँग ऑफमधून झेल देऊन माघारी पाठवले.
दिल्ली कॅपिटल्स इलेव्हन : मेग लॅनिंग (क), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, अॅलिस कॅप्सी, जेस जोनासेन, तानिया भाटिया (विकेटकीपर), मिन्नू मणी, शिखा पांडे, राधा यादव आणि तारा नॉरिस. मुंबई इंडियन्स इलेव्हन : हरमनप्रीत कौर (क), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, हुमैरा काझी, अमनजोत कौर, जिंतीमणी कलिता आणि सायका इशाक.