नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड संघात एक कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला 1 जुलैला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी भारतीय संघाच कर्णधार रोहित शर्माचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बीसीसीआयने सलामीवीर मयंक अग्रवालचा कर्णधार रोहित शर्माचा कव्हर म्हणून इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटीसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला ( Mayank Agarwal join Indian Test team ) आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळल्याने रोहित शर्मा या कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे.
रोहित पहिल्या दिवशी लीसेस्टरशायरविरुद्ध अनिर्णित राहिलेल्या सराव सामन्यात खेळला पण तेव्हापासून तो क्वॉरंटाइन आहे. कारण रॅपिड अँटीजेन चाचणीत त्याचा अहवाल पॉझिटिव्ह ( Rohit Sharma Corona Positive ) आला होता. 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या कसोटीत 15 जणांच्या संघात मयंकचा समावेश नव्हता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी केएल राहुल जखमी झाला होता आणि आता रोहितला कोरोना संसर्ग झाल्यामुळे त्याला मिळाली आहे.
-
Mayank Agarwal to join India's squad as Rohit Sharma's replacement in Edgbaston Test
— ANI Digital (@ani_digital) June 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/F23zih50KQ#EngvsInd #MayankAgarwal #RohitSharma #testcricket pic.twitter.com/pBU6ZFYY9C
">Mayank Agarwal to join India's squad as Rohit Sharma's replacement in Edgbaston Test
— ANI Digital (@ani_digital) June 27, 2022
Read @ANI Story | https://t.co/F23zih50KQ#EngvsInd #MayankAgarwal #RohitSharma #testcricket pic.twitter.com/pBU6ZFYY9CMayank Agarwal to join India's squad as Rohit Sharma's replacement in Edgbaston Test
— ANI Digital (@ani_digital) June 27, 2022
Read @ANI Story | https://t.co/F23zih50KQ#EngvsInd #MayankAgarwal #RohitSharma #testcricket pic.twitter.com/pBU6ZFYY9C
बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, मयंक आज रोहितसाठी कव्हर म्हणून ( Mayank as cover for Rohit ) रवाना होत आहे आणि गरज पडल्यास कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असेल. यूकेच्या कोविड प्रोटोकॉलनुसार, आरटी पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यास आयसोलेशनमध्ये राहण्याची गरज नाही.
पाचवी कसोटीही मालिकेतील निर्णायक कसोटी आहे जी गेल्या वर्षी अपूर्ण राहिली होती. भारतीय शिबिरात कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमुळे पाचवी कसोटी पुढे ढकलण्यात आली. या मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे. मयंकने आतापर्यंत 21 कसोटीत 41.33 च्या सरासरीने 1488 धावा केल्या आहेत. त्याने मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती.
हेही वाचा -PM Narendra Modi praised Mithali : मिताली अनेक खेळाडूंसाठी प्रेरणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी