ETV Bharat / sports

MCC Mankading Rule : मंकडिंग करणे चुकीचे ठरणार नाही ; एमसीसीने नियमात केला मोठा बदल - MCC new rule

एमसीसीच्या नवीन नियमानुसार ( New rules of MCC ) जर गोलंदाज एखाद्या फलंदाजाला मंकडिंग द्वारे बाद करत असेल, तर ते नियमानुसार योग्य असणार आहे. कारण मेरीलेबोन क्रिकेट क्लब म्हणजेच एमसीसीने मंकडिंग द्वारे करणे आउट कायदेशीर असल्याचे घोषित केले आहे

Cricket
Cricket
author img

By

Published : Mar 9, 2022, 4:43 PM IST

लंडन : मेरीलेबोन क्रिकेट क्लब ( Marylebone Cricket Club ) म्हणजेच एमसीसीने मंकडिंग द्वारे करणे आउट कायदेशीर असल्याचे घोषित केले आहे. एमसीसीच्या नवीन नियमानुसार जर गोलंदाज एखाद्या फलंदाजाला मंकडिंग द्वारे बाद करत असेल, तर ते नियमानुसार योग्य असणार आहे. आतापर्यंत या मंकडिंग द्वारे बाद केले गेले तर ते अयोग्य मानले जात नव्हते. ज्याला आता नियम 38 मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

मागील काही वर्षापूर्वी रविचंद्रन अश्विनने राजस्थान रॉयल्स संघाचा फलंदाज जॉस बटलरला मंकडिंग द्वारे बाद ( Ashwin argues Butler Mankading )केले होते. त्यावरुन बराच क्रिकेट मोठा गोंधळ निर्माण झाला होता.आश्विनच्या या कृतीला खेळ भावनेच्या विरुद्ध असल्याचे म्हणले गेले होते. त्यावर आश्विनची प्रतिक्रिया ही होती की, त्याने कोणतेही असे वर्तन केले नाही की, जे नियमांचे भंग करते.

  • MCC has today announced its new code of Laws for 2022, which will come into force from 1 October.

    Full information on the changes ⤵️#MCCLaws

    — Marylebone Cricket Club (@MCCOfficial) March 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मंकडिंग नियमाबद्दल एमसीसीचे लॉ मॅनेजर फ्रेसर स्टीवर्ड ( MCC Law Manager Fraser Steward ) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. फ्रेसर स्टीवर्ड म्हणाले, 2017 मध्ये क्रिकेटच्या नियमांबाबतची संहिता प्रसिद्ध झाल्यानंतर या खेळात बराच बदल झाला आहे. त्या कोडची दुसरी आवृत्ती 2019 मध्ये प्रकाशित झाली. जरी त्यात मुख्यतः स्पष्टीकरण आणि किरकोळ बदल असले तरी, 2022 कोडमध्ये बरेच मोठे बदल झाले आहेत. आपण ज्या पद्धतीने क्रिकेटबद्दल बोलतो त्यापासून आपण ते कसे खेळतो, हे सर्व त्याबद्दल आहे.

एमसीसीच्या निवेदनात चेंडूवरील लाळेच्या बंदी बाबतही सांगण्यात आले आहे. नवीन नियमानुसार चेंडूवर लाळ लावणे पूर्णपणे चुकीचे आहे. जर कोणत्या खेळाडूंने असे कृत्य केले, तर त्याला चेंडूशी छेडछाड करण्याच्या श्रेणीत ( Ball tampering range ) टाकले जाईल आणि या कृतीला नियमानुसार चूकीचे मानले जाईल. तसेच आता हे नियम आसीसी आणि राष्ट्रीय क्रिकेट संघटना यांच्यावर अवलंबून आहे की, ते हे नियम स्विकारणार की नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.