हैदराबाद: आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात 'मिस्टर आयपीएल' म्हणून परिचित असलेल्या, सुरेश रैनाला खरेदी करण्यात कोणत्याही संघाने रस दाखवला नाही. त्यामुळे सुरेश रैना आयपीएलच्या पंधराव्या हंगामात ( Fifteenth season of IPL ) खेळताना दिसणार नाही. या कारणामो सुरेश रैनाचे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होता. परंतु आता सुरेश रैनाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण रैनाची 2022 च्या मालदीव स्पोर्ट्स अवॉर्ड्समध्ये स्पोर्ट्स आयकॉन म्हणून निवड करण्यात आली आहे.
-
Thank you for the honour Honourable @ibusolih and Mr @AhmedMahloof. The feeling of representing India 🇮🇳 on a global platform among all the world champions is unmatchable. Congratulations on organising such an exclusive award ceremony. Way to go 🙌 #MaldivesSportsAwards2022 pic.twitter.com/VPNtIWh03K
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) March 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Thank you for the honour Honourable @ibusolih and Mr @AhmedMahloof. The feeling of representing India 🇮🇳 on a global platform among all the world champions is unmatchable. Congratulations on organising such an exclusive award ceremony. Way to go 🙌 #MaldivesSportsAwards2022 pic.twitter.com/VPNtIWh03K
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) March 18, 2022Thank you for the honour Honourable @ibusolih and Mr @AhmedMahloof. The feeling of representing India 🇮🇳 on a global platform among all the world champions is unmatchable. Congratulations on organising such an exclusive award ceremony. Way to go 🙌 #MaldivesSportsAwards2022 pic.twitter.com/VPNtIWh03K
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) March 18, 2022
भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाचा मालदीवमध्ये एक मोठा सन्मान ( Suresh Raina honored in Maldives ) करण्यात आला आहे. रैनाची 2022 च्या मालदीव स्पोर्ट्स अवॉर्ड्समध्ये स्पोर्ट्स आयकॉन म्हणून निवड ( Selection as a sports icon ) करण्यात आली आहे. श्रीलंकेचा माजी दिग्गज सनथ जयसूर्यासह फुटबॉल जगतातील आणि ऍथलेटिक्समधील खेळाडूंसह 16 आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह रैनाचे नामांकन करण्यात आले होते.
-
Thank you @AhmedMahloof ! looking forward to being there and seeing you at the #MaldivesSportsAwards2022. https://t.co/kbo2G2wvqO
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) March 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Thank you @AhmedMahloof ! looking forward to being there and seeing you at the #MaldivesSportsAwards2022. https://t.co/kbo2G2wvqO
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) March 15, 2022Thank you @AhmedMahloof ! looking forward to being there and seeing you at the #MaldivesSportsAwards2022. https://t.co/kbo2G2wvqO
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) March 15, 2022
सुरेश रैनाने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत केलेल्या सर्व कामगिरीमुळे त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. एका प्रसिद्धी पत्रकाच्या माहितीनुसार हा कार्यक्रम 17 मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. पुरस्कार मिळाल्यानंतर रैनाने ट्विटरवर आयोजकांचे आभार मानले ( Raina thanked the organizers ) आहेत. रैनाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "आदरणीय इब्राहिम मोहम्मद सोलिह आणि अहमद महलूफ यांचे आभार. जागतिक व्यासपीठावर सर्व जगज्जेत्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची भावना आश्चर्यकारक आहे. असा अप्रतिम पुरस्कार सोहळा आयोजित केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन."
सुरेश रैनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द -
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2005 साली पदार्पण करणाऱ्या सुरेश रैनाने भारतासाठी 226 एकदिवसीय, 78 टी-20 आणि 18 कसोटी सामने खेळले आहेत. 2011 मध्ये क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघात रैनाचाही समावेश होता. त्याने भारतासाठी 5615 एकदिवसीय आणि 1605 टी-20 धावा केल्या आहेत. रैनाने वनडेमध्ये पाच शतके आणि 36 अर्धशतके, तर टी-20मध्ये एक शतक आणि पाच अर्धशतके केली आहेत. रैनाने कसोटी क्रिकेटमध्ये एक शतक आणि सात अर्धशतकांच्या मदतीने 768 धावा केल्या आहेत. रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 62 विकेट्सही घेतल्या आहेत.
सुरेश रैनाची आयपीएल कारकीर्द -
सुरेश रैनाने 19 एप्रिल 2008 साली चेन्नई संघाकडून पंजाब विरुद्धच्या सामन्यात आयपीलएल स्पर्धेत पदार्पण केले होते. इंडियन प्रीमियर लीगमध्ये अधिकत्तर सामने चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या रैनाने लीगमधील 205 सामन्यांमध्ये 5528 धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. चेन्नईसह चार वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या रैनाला यावेळी लिलावात कोणीही खरेदीदार मिळाला नाही. गेल्या मोसमात तो चेन्नईकडून खेळला होता, पण त्याची कामगिरी काही खास नव्हती.