ETV Bharat / sports

Mahendra Singh Dhoni: क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी पुन्हा ठरला झारखंडचा सर्वात मोठा करदाता

author img

By

Published : Mar 31, 2022, 7:21 PM IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वाधिक कर भरण्याचा विक्रम करणारा रांचीचा महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा झारखंडचा सर्वात मोठा वैयक्तिक करदाता ( MS Dhoni is the biggest taxpayer ) बनला आहे. चालू आर्थिक वर्षात त्यांनी 38 कोटी रुपयांचा आगाऊ कर जमा केला आहे.

Dhoni
Dhoni

रांची: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने ( Former skipper Mahendra Singh Dhoni ) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला दोन वर्षापूर्वी रामराम ठोकला आहे. परंतु त्याच्या वार्षिक उत्पन्नावर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. गेल्या वर्षभरात त्यांच्या उत्पन्नात सुमारे 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

त्यांनी प्राप्तिकर विभागात जमा केलेला आगाऊ कर याची साक्ष देतो की, त्यांनी 2021-22 या वर्षासाठी प्राप्तिकर विभागाला 38 कोटी रुपये आगाऊ कर म्हणून भरले आहेत. गेल्या वर्षी म्हणजे 2020-21 मध्ये ही रक्कम सुमारे 30 कोटी होती. आयकर विभागाच्या उच्चपदस्थ सूत्रांच्या माहितीनुसार, महेंद्रसिंग धोनी या वर्षी देखील झारखंडचा सर्वात मोठा वैयक्तिक करदाता ( Individual tax payer ) ठरला आहे.

झारखंडमधील वैयक्तिक श्रेणीतील सर्वात मोठा करदाता - तज्ज्ञांच्या मते, धोनीने जमा केलेल्या 38 कोटींच्या आगाऊ कराच्या आधारे, त्याचे उत्पन्न 2021-22 मध्ये सुमारे 130 कोटी राहण्याची अपेक्षा आहे. आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार, धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द ( Dhoni's international cricket career ) सुरू केल्यापासून झारखंडमधील वैयक्तिक श्रेणीतील सर्वात मोठा आयकर भरणारा आहे. सन 2019-20 मध्ये त्यांनी 28 कोटी भरले होते आणि त्याआधी 2018-19 मध्ये देखील जवळपास तेवढीच रक्कम आयकर म्हणून भरली होती. याआधी त्यांनी 2017-18 मध्ये 12.17 कोटी आणि 2016-17 मध्ये 10.93 कोटी आयकर भरला होता.

धोनीच्या उत्पन्नांचे स्रोत - 15 ऑगस्ट 2020 रोजी, धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून एक खेळाडू म्हणून निवृत्ती घेतली आहे. व्यावसायिक खेळपट्टीवर तो एक शानदार खेळाडू म्हणून खेळी खेळत आहे. कारण त्याने आयपीएल 2022च्या सुरुवातीला सीएसकेच्या कर्णधार पदावरुन पायउतार ( Stepping down as CSK captain ) झाला आहे. मात्र एक खेळाडू म्हणून त्यांचा आयपीएलशी संबंध कायम आहे. भारताच्या माजी कर्णधाराने अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांनी स्पोर्ट्स वेअर, होम इंटिरियर कंपनी होमलेन, वापरलेली कार विक्री कंपनी कार्स 24, स्टार्टअप कंपनी खतबुक, स्पोर्ट्स कंपनी रन अॅडम, क्रिकेट कोचिंग आणि सेंद्रिय शेतीमध्येही गुंतवणूक केली आहे. रांचीमध्ये तो सुमारे 43 एकर जमिनीवर सेंद्रिय शेती करतो.

हेही वाचा - Wwc 2022: दक्षिण आफ्रिकेला 137 धावांनी मात देत इंग्लंड आठव्यांदा अंतिम फेरीत दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.