नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन ( Fast bowler Mitchell Johnson ) मैदानावरील आक्रमक वृत्तीसाठी ओळखला जातो. तो सध्या लिजेंड्स लीग क्रिकेटसाठी ( Legends League 2022 ) भारतात आहे. पण युसूफ पठाणसोबत मैदानावर केलेल्या वादामुळे त्याला मोठी किंमत मोजावी लागली आहे. खरं तर, लिजेंड्स लीग क्रिकेट सामन्यादरम्यान, त्याचा आणि युसूफ पठाणमधला ( Yusuf Pathan and Johnson Clashed in Field ) एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. ज्यामध्ये दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. मात्र आता लिजेंड्स लीग क्रिकेटने त्याच्यावर कारवाई केली ( Action on Mitchel johnson ) आहे.
लीगने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "या डावखुऱ्या गोलंदाजाला या वर्तनाबद्दल ताकीद देण्यात आली आहे. एवढेच नाही तर त्याला त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के दंडही ( Mitchell Johnson fined 50 percent of match fee ) ठोठावण्यात आला आहे. त्याला या लीगचे आयुक्त रवी शास्त्री यांनी देखील फटकारले आहे."
-
Some heated moments between Mitchell Johnson and Yusuf Pathan during @llct20 knock-outs.
— Aji Rasheed Ali اجی رشید علی (@ajirasheed) October 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The incident took place during the qualifier match between India Capitals and Bhilwara Kings where Johnson got engaged in a verbal exchange with Pathan.#MitchellJohnson #YusufPathan #ICYMI pic.twitter.com/DxVwRsr2VL
">Some heated moments between Mitchell Johnson and Yusuf Pathan during @llct20 knock-outs.
— Aji Rasheed Ali اجی رشید علی (@ajirasheed) October 3, 2022
The incident took place during the qualifier match between India Capitals and Bhilwara Kings where Johnson got engaged in a verbal exchange with Pathan.#MitchellJohnson #YusufPathan #ICYMI pic.twitter.com/DxVwRsr2VLSome heated moments between Mitchell Johnson and Yusuf Pathan during @llct20 knock-outs.
— Aji Rasheed Ali اجی رشید علی (@ajirasheed) October 3, 2022
The incident took place during the qualifier match between India Capitals and Bhilwara Kings where Johnson got engaged in a verbal exchange with Pathan.#MitchellJohnson #YusufPathan #ICYMI pic.twitter.com/DxVwRsr2VL
"इंडिया कॅपिटल्सचा ( India Capitals ) वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनला रविवारी लिजेंड्स लीगच्या सामन्यादरम्यान जोरदार वाद घातल्याबद्दल चेतावणी देण्यात आली आहे. त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे," असे निवेदनात म्हटले आहे. तत्पूर्वी, या घटनेच्या सविस्तर तपासानंतर, लिजेंड्स लीग क्रिकेट आयुक्त रवी शास्त्री ( Legends League Cricket Commissioner Ravi Shastri ) यांच्या नेतृत्वाखालील शिस्तपालन समितीने गोलंदाजाला दंड ठोठावण्याचा आणि त्याला अधिकृत इशारा पाठवण्याचा निर्णय घेतला."
भर मैदानात भिडले होते दोघे -
रविवारी इंडिया कॅपिटल्स आणि भिलवाडा किंग्ज ( India Capitals Vs Bhilwara Kings ) यांच्यात झालेल्या क्वालिफायर सामन्यात दोन्ही खेळाडू एकमेकांशी ( Controversy between Yusuf Pathan and Mitchell Johnson ) भिडले. वाद इतका वाढला की पंचाला हस्तक्षेप करावा लागला आणि नंतर कसेतरी प्रकरण मिटले. वास्तविक, या सामन्यादरम्यान युसूफ पठाणने पहिल्या तीन चेंडूत 6, 4 आणि 6 धावा ठोकल्या, तेव्हा दोघांमधील हा वाद सुरू झाला. तसेच इंडिया कॅपिटल्स आधीच अंतिम फेरीत पोहोचले आहे. बुधवारी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर त्यांचा सामना भिलवाडा कॅपिटल्सशी होईल.
हेही वाचा - IND vs SA 3rd T20 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 'या' कारणामुळे खेळणार नाही विराट कोहली