मुंबई : आयपीएल 2022 ( IPL 2022 ) च्या हंगामाला सुरुवात होण्यासाठी आता फक्त सहा दिवस शिल्ल्क राहिले आहेत. या स्पर्धेता मेगा लिलाव बंगळुरु येथे पार पडला होता. या लिलावात सुरेश रैना अनसोल्ड राहिला होता. याबाबत आता राजस्थान रॉयल्सचा डायरेक्टर ऑफ क्रिकेट कुमार संगकारने मोठे वक्तव्य ( Big statement by Kumar Sangakkara ) केले आहे. ज्यामध्ये त्याने सुरेश रैनाला का खरेदी करण्यात आले नाही, याचे कारण सांगितले आहे.
आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात सुरेश रैनाला कोणीही खरेदी केले ( Suresh Raina Unsold ) नाही. या लिलावात त्याची बेस प्राईज 2 कोटी होती. तरी देखील कोणत्याही फ्रँचायझीने त्याला खरेदी करण्यात रुची दाखवली नाही. त्यामुळे तो या हंगामात अनसोल्ड राहिला. त्यामुळे तो या हंगामात हिंदी समालोचन करताना दिसणार आहे. सुरेश रैना का अनसोल्ड राहिला याचे कारण कुमार संगकाराने सांगितले आहे.
सुरेश रैनाला कोणत्याही संघाने का खरेदी केले नाही, याचे कारण सांगताना कुमार संगकारा ( Kumar Sangkara on Suresh Raina ) म्हणाला, जस-जशी वर्ष निघून जातात, तस-तसे खेळाडू देखील बदलले जातात. युवा खेळाडू आपले रेपुटेशन बनवतात. जर रैनाच्या रेपुटेशनबद्दल बोलायचे झाले, तर आयपीएल स्पर्धेत त्याचा दबदबा आहे. तो या स्पर्धेतील एक महान खेळाडू राहिला आहे. प्रत्येक हंगामात त्याने शानदार प्रदर्शन केले आहे. जर आपण अजून खोलात गेलो, तर तो या हंगामासाठी कदाचित ज्यादा सूट होत नाही. त्यामुळे त्याला कोणत्याही फ्रँचायझीने त्याला खरेदी करण्यात रस दाखवला नाही. जरी असे असले, तरी त्याचे महत्व कमी होत नाही. त्यामुळे त्याची महानता देखील कमी होत नाही.
सुरेश रैना हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक मानला जातो. या खेळाडूने लीगमध्ये अनेक उत्कृष्ट खेळी खेळल्या आहेत आणि क्षेत्ररक्षणातही एक वेगळी पातळी निर्माण केली आहे. रैनाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तो या लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू आहे. त्याने 205 सामन्यांमध्ये 136.76 च्या स्ट्राइक रेटने 5528 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक शतक आणि 39 अर्धशतकं झळकावली आहेत.