ब्रिजटाउन: वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड ( West Indies v England ) संघात तीन सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील ब्रिजटाउन येथे खेळला गेलेला दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. हा सामना वेस्ट इंडिजचा क्रेग ब्रेथवेटसाठी ( Kraigg Brathwaite New Record) संस्मरणीय ठरला. क्रेग ब्रेथवेटने आपल्या संघासाठी दोन्ही डावात शानदार फलंदाजी केली. ज्यामुळे हा सामना वेस्ट इंडिज संघाला अनिर्णित राखण्यात यश आले. त्याचबरोबर या सामन्यात एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
-
A truly remarkable landmark as a Test batsman.👏🏿
— Windies Cricket (@windiescricket) March 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
@K_Brathwaite has now faced more balls in a Test match than both @BrianLara & Sir Garry Sobers.👏🏿#WIvENG #MenInMaroon pic.twitter.com/2VepDlpIzX
">A truly remarkable landmark as a Test batsman.👏🏿
— Windies Cricket (@windiescricket) March 20, 2022
@K_Brathwaite has now faced more balls in a Test match than both @BrianLara & Sir Garry Sobers.👏🏿#WIvENG #MenInMaroon pic.twitter.com/2VepDlpIzXA truly remarkable landmark as a Test batsman.👏🏿
— Windies Cricket (@windiescricket) March 20, 2022
@K_Brathwaite has now faced more balls in a Test match than both @BrianLara & Sir Garry Sobers.👏🏿#WIvENG #MenInMaroon pic.twitter.com/2VepDlpIzX
एका सामन्यात सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम -
वेस्ट इंडिजच्या पहिल्या आणि दुसऱ्या डावात क्रेग ब्रेथवेटने एकूण 673 चेंडूचा सामना केला. त्याचबरोबर त्याने एक कसोटी सामन्यात सर्वाधिक चेंडूचा सामना करण्याचा विक्रम केला आहे. तसेच त्याने वेस्ट इंडिज संघाचे माजी कर्णधार ब्रायन लारा ( Former captain Brian Lara ) यांचा 18 वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. या अगोदर ब्रायन लारा यांनी 2004 साली इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात 582 चेंडूचा सामना करताना, एकाच सामन्यात सर्वाधिक चेंडूचा सामना करण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता. त्यांच्यानंतर अष्टपैलू खेळाडू गॅरी सोबर्स ( All-rounder Gary Sobers ) यांचे नाव येते. गॅरी सोबर्स यांनी 1985 साली एकाच सामन्यात 575 चेंडूचा सामना केला होता.
-
Match drawn! An incredible effort by both side over the last 5 days.👏🏿
— Windies Cricket (@windiescricket) March 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Next up.. the Spice isle!🇬🇩 #WIvENG pic.twitter.com/2UBh1E9MWT
">Match drawn! An incredible effort by both side over the last 5 days.👏🏿
— Windies Cricket (@windiescricket) March 20, 2022
Next up.. the Spice isle!🇬🇩 #WIvENG pic.twitter.com/2UBh1E9MWTMatch drawn! An incredible effort by both side over the last 5 days.👏🏿
— Windies Cricket (@windiescricket) March 20, 2022
Next up.. the Spice isle!🇬🇩 #WIvENG pic.twitter.com/2UBh1E9MWT
ब्रॅथवेटने पहिल्या डावात 489 चेंडूत 160 धावा केल्या आणि नंतर 184 चेंडूंचा सामना करत अंतिम दिवशी संघाला संकटातून बाहेर काढण्यासाठी 56 धावा केल्या. त्याच्या खेळीचे कारण म्हणजे इंग्लिश संघ विजयापासून वंचित राहिला.