अबूधाबी: नाइट रायडर्स ग्रुपने ( Knight Riders Group ) गुरुवारी जाहीर केले की, त्यांनी अबूधाबी फ्रँचायझी खरेदी केली ( Bought the Abu Dhabi franchise ) आहे. अबूधाबी नाइट रायडर्स हा संघ ( ADKR ) आगामी यूएई T20 लीगचा एक भाग असणार आहे.
-
Excited to be a part of this journey! 💜 https://t.co/FxeiGq4j3O
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Excited to be a part of this journey! 💜 https://t.co/FxeiGq4j3O
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 12, 2022Excited to be a part of this journey! 💜 https://t.co/FxeiGq4j3O
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 12, 2022
अभिनेता शाहरुख खान ( Actor Shah Rukh Khan ) म्हणाला, “अनेक वर्षांपासून आम्ही नाइट रायडर्स ब्रँडचा जागतिक स्तरावर विस्तार करत आहोत. तसेच यूएईमध्ये टी-20 क्रिकेटच्या शक्यतांवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. यूएईच्या टी-20 लीगचा भाग होण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत, जे निःसंशयपणे एक मोठे यश असेल. आयपीएल, सीपीएल आणि एमएलसीनंतर नाइट रायडर्स गट हा या स्पर्धेतील सहावा संघ आणि टी-20 लीगमधील त्यांची चौथी गुंतवणूक असेल.
एमिरेट्स क्रिकेट बोर्ड (ECB) चे सरचिटणीस मुबशीर उस्मानी ( ECB General Secretary Mubashir Usmani ) म्हणाले, “आम्हाला फ्रँचायझी संघ मालक म्हणून नाईट रायडर्स ग्रुपला लीगशी जोडताना आनंद होत आहे. आम्हाला खात्री आहे की, ही संघटना नाइट रायडर्स ब्रँड आणि लीग या दोन्हींसाठी परस्पर फायदेशीर ठरेल.
यूएई टी-20 ( UAE T20 ) लीगच्या इतर संघ मालकांमध्ये अदानी ग्रुप (ज्याने तीन दिवसांपूर्वी फ्रँचायझी मिळवली), कॅप्री ग्लोबल, लान्सर कॅपिटल, रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड (मुंबई इंडियन्सचे मालक) आणि जीएमआर ग्रुप (दिल्ली कॅपिटल्सचे मालक) यांचा समावेश आहे. यूएई टी-20 ( UAE T20 ) लीगमधील सहा फ्रँचायझी संघ यावर्षी खेळल्या जाणार्या स्पर्धेच्या पहिल्या सत्रात 34 सामन्यांमध्ये भाग घेतील.
हेही वाचा - Captain Bismah Maroof : पाकिस्तान महिला संघाच्या कर्णधार पदावर बिस्माह मारूफ कायम