दुबई : आयसीसीने बुधवारी आयसीसी टी-20 रँकिंग जाहीर केली (ICC T20 rankings announced) आहे. या ताज्या रँकिंगमध्ये भारतीय मर्यादीत षटकांच्या सामन्याचा उपकर्णधार आणि सलामी फलंदाज केएल राहुलला पहिल्या पाचात स्थान देण्यात आले आहे. त्याने इंग्लंडच्या डेव्हिड मलानला मागे टाकत एका स्थानाच्या फायद्यासह चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.
आयसीसी टी-20 क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा 805 गुणांसह पहिल्या स्थानावर (Babar Azam topped with 805 points) विराजमान आहे. त्याच्यानंतर मोहम्मद रिझवान (798 गुण) आणि दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम (Aiden Markram of South Africa) (796 गुण) हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानांवर विराजमान आहेत. तसेच भारताचा फलंदाज केएल राहुल चौथ्या स्थानी आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Former India captain Virat Kohli) आणि नवा कर्णधार रोहित शर्मा यांनी ताज्या क्रमवारीत फलंदाजांमध्ये अनुक्रमे 10वे आणि 11वे स्थान कायम राखले आहे.
दरम्यान, डावखुरा फिरकी गोलंदाज अकिल हुसेन (Left-arm spinner Akil Hussain) आणि वेगवान गोलंदाज जेसन होल्डर यांनी ब्रिजटाऊन येथे इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 17 धावांनी निर्णायक सामना जिंकण्यात मोलाचा वाटा उचलला. आणि गोलंदाजांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग मिळवले. या श्रेणीतील टॉप-10 मध्ये एकही भारतीय गोलंदाज नाही. भुवनेश्वर कुमारला एका स्थानाचा तोटा झाला असून तो 20व्या स्थानावर पोहोचला आहे.
अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार होल्डरने, निर्णयाक सामन्यात 5/27 विकेट सोबत चार सामन्याच्या मालिकेत 9 विकेट्स मिळवल्या होत्या. ज्याचा फायदा त्याला आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत झाला आहे. त्याला तीन स्थानांचा फायदा होऊन तो 23 व्या स्थानावर पोहोचला आहे.
वेस्ट इंडिजचा शेल्डन कॉट्रेल 10 स्थानांच्या फायद्याने 31 व्या स्थानावर आला आहे, तर इंग्लंडचा फिरकी गोलंदाज मोईन अली (तीन स्थानांच्या फायद्यांनी वर 32 व्या स्थानावर) आणि लियाम लिव्हिंग्स्टन (33 स्थानांच्या फायद्याने 68 व्या स्थानावर) आले आहेत. फलंदाजांच्या क्रमवारीत निकोलस पूरनने झेप घेतली आहे. तीन सामन्यांत 113 धावा करून आठ स्थानांच्या फायद्याने 18व्या स्थानावर आहे.