ETV Bharat / sports

Kapil Dev's advice to Virat : कपिल देवचा विराट कोहलीला सल्ला, म्हणाला, "तू देशाचा विचार कर"

दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने असे वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा नव्या वादांना तोंड फुटले आहे. याबाबत कपिल देव यांनी भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीला कडक सल्ला दिला आहे.

कपिल देवचा विराट कोहलीला सल्ला
कपिल देवचा विराट कोहलीला सल्ला
author img

By

Published : Dec 16, 2021, 4:37 PM IST

हैदराबाद - एकदिवसीय कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर विराट कोहलीने 15 डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्याने अनेक मोठे खुलासे केले. कोहलीने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचे विधान फेटाळून लावले की बोर्डाने त्याला टी-20 संघाचे कर्णधारपद सोडू नये असे सांगितले होते. विराट कोहलीच्या या वक्तव्यामुळे बीसीसीआयमधील तणाव स्पष्ट झाला आहे. सध्यातरी भारताचा माजी कर्णधार आणि महान अष्टपैलू कपिल देव यांनी या प्रकरणी आपलं मत व्यक्त केलं आहे.

विराट कोहलीच्या या वक्तव्याबद्दल भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारा महान कर्णधार कपिल देव एका वाहिनीशी बोलताना म्हणाला की, त्यांनी आपला निर्णय कोणाला सांगायचा की नाही ही निवडकर्त्यांची मर्जी आहे. निवडकर्त्यांनी विराट कोहलीइतके क्रिकेट खेळले नसेल, पण कर्णधारपदाचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे. त्यांना कुणालाही काहीही सांगण्याची गरज नाही, अगदी विराटलाही नाही. खेळाडूंनी ही अपेक्षा करू नये.

अखेर, गांगुली काय म्हणाला होता?

गांगुलीने नुकतेच सांगितले की, टी-20 कर्णधारपद सोडताना त्याने स्वतः कोहलीला राजीनामा देऊ नये असे सांगितले होते. मात्र, कोहलीने पत्रकार परिषदेत सांगितले की, मला कोणीही थांबवले नाही. कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष यांच्या विधानातील तफावतीचा बोर्ड आणि भारतीय क्रिकेटच्या प्रतिमेवर परिणाम झाला आहे. कपिल म्हणाला की कोहलीने बोर्ड अध्यक्षांविरोधात बोलायला नको होते.

कपिल म्हणाला, मी कोहलीचा खूप मोठा चाहता आहे, पण कोणत्याही खेळाडूने बीसीसीआय अध्यक्ष किंवा बोर्डाच्या विरोधात बोलू नये. जेव्हा मला कर्णधारपदावरून हटवण्यात आले तेव्हा मला खूप दुःख झाले होते. पण लक्षात ठेवा तुम्ही देशासाठी खेळत आहात. यापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही.

या संपूर्ण गोंधळानंतर बीसीसीआयने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. परंतु सध्याच्या वादाचा कोहलीच्या कसोटीतील कर्णधारपदावर परिणाम होऊ नये, अशी आशा कपिलने व्यक्त केली आहे. कपिल म्हणाला, मला आशा आहे की या वादाचा विराट कोहलीच्या कसोटी कर्णधारपदावर परिणाम होऊ नये. तो एक महान खेळाडू आणि महान क्रिकेटपटू आहे. निवडकर्ते असाच विचार करतील अशी आशा आहे. विराटने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

हेही वाचा - Controversy Over Cricket Captaincy : कोहलीच्या प्रतिक्रियेवर बोलताना गावस्कर म्हणाले, Bcci प्रमुख गांगुलीला प्रश्न विचारायला हवा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.