ETV Bharat / sports

विराट कोहलीची क्रमवारीत सहाव्या स्थानावर घसरण, कशी ठरते रॅकिंग?, जाणून घ्या

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आयसीसी कसोटी क्रमवारीत टॉप-5 मधून बाहेर फेकला गेला आहे. तो पाचव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर घसरला आहे. दुसरीकडे इंग्लंडचा कर्णधार जो रुटने दमदार कामगिरी करत क्रमवारीत अव्वलस्थान पटकावले आहे.

Joe Root Became The World No one Test Batsman Rohit Surpassed Virat To Reach 5th Place, how virat slipped into 6th position know about it
विराट कोहली क्रमवारीत सहाव्या स्थानावर कसा घसरला?, कशी ठरते रॅकिंग, जाणून घ्या
author img

By

Published : Sep 1, 2021, 10:47 PM IST

मुंबई - आयसीसीने ताजी कसोटी फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या क्रमवारीत टॉप-5 मधून बाहेर फेकला गेला आहे. तो पाचव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर घसरला आहे. दुसरीकडे इंग्लंडचा कर्णधार जो रुटने दमदार कामगिरी करत क्रमवारीत अव्वलस्थान पटकावले आहे. दरम्यान, ही क्रमवारी कशी ठरते याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

आयसीसी प्रत्येक कसोटी सामना आणि एकदिवसीय मालिकेनंतर क्रमवारी जाहीर करते. कसोटी क्रमवारीत मागील 12 ते 15 महिन्यापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूला स्थान मिळते. जर एकादा खेळाडू दुखापतीमुळे किंवा इतर कारणाने या काळात खेळू शकला नाही तर त्याला क्रमवारीत स्थान मिळत नाही. याशिवाय कोणत्याही खेळाडूने 12 ते 15 महिन्यादरम्यान, निवृत्तीची घोषणा केली तर त्याचे नाव क्रमवारीतून वगळण्यात येते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये हा कालावधी 9 ते 12 महिने असतो.

खेळाडूची क्रमवारी कशी ठरते

खेळाडूची क्रमवारी त्यांना मिळालेल्या गुणांवर ठरते. गुण हे त्या खेळाडूने सामन्यात केलेल्या प्रदर्शनानुसार दिले जातात. गुण देताना त्या खेळाडूने कोणत्या परिस्थितीत चांगली कामगिरी केली, ज्याचा त्याच्या संघाला फायदा झाला, याचा विचार केला जातो.

नाबाद शतक झळकावल्यानंतर मिळतात जास्त गुण

नाबाद शतक झळकावणारा फलंदाज किंवा 5 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला बोनस गुण दिले जाते. अर्धशतक आणि शतक करणाऱ्या तसेच वेगाने धावा करणाऱ्या फलंदाजाला अधिक गुण दिले जातात. जर कोणत्या फलंदाजाने, गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या गोलंदाजाविरोधात किंवा त्या संघाविरोधात चांगले प्रदर्शन केल्यास त्याला जास्त गुण दिले जातात.

गोलंदाजांच्या चांगल्या प्रदर्शनाने संघाने विजय मिळवला तर त्या खेळाडूला बोनस गुण दिले जाते. याच प्रकारे गोलंदाजांला त्याची कामगिरी आणि इकोनॉमी तसेच विकेट पाहून गुण दिले जातात. गुण देताना गोलंदाजामुळे विरोधी संघ कमी धावसंख्येवर बाद झाला, याचा विचार देखील केला जातो. कठिण खेळपट्टीवर चांगल्या सरासरीने धावा करणे किंवा विकेट घेण्यावर देखील रेटिंग गुण मिळतात.

यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षक यांची क्रमवारी कशी ठरते

यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षक यांची क्रमवारी आयसीसी जाहीर करत नाही. कारण याचे आकलन करणे कठीण आहे. टॉप10 मध्ये जागा मिळवण्यासाठी खेळाडूंना कमीत कमी 750 गुण जमवावे लागतात. 900 गुण मिळवणे खेळाडूसाठी मोठी कामगिरी मानली जाते. 900 गुण मिळवणारा खेळाडू खूप काळापासून चांगली कामगिरी करत आहे, असे मानले जाते.

विराट कोहलीचे आहेत 766 गुण

आयसीसी कसोटी क्रमवारीनुसार इंग्लंडचा कर्णधार जो रूटचे 916 गुण आहेत. तर केन विल्यमसन 901 गुणासह दुसऱ्या स्थानी आहे. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचे स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन आहेत. पाचव्या स्थानावर रोहित शर्मा 773 गुणांसह आहे. तर विराट कोहली 766 गुणांसह सहाव्या स्थानी घसरला आहे. विराट रुटपेक्षा 150 गुणांनी मागे आहे. विराटने मागील 5 डावात 124 धावा केल्या आहेत. तर जो रूटने 5 डावात 126 च्या सरासरीने तीन शतकासह 507 धावा केल्या आहेत. या कामगिरीमुळे तो क्रमवारीत अव्वल ठरला आहे. दुसरीकडे विराटला खराब कामगिरीचा फटका बसला आहे.

हेही वाचा - PKL Auction : भंडाऱ्याच्या आकाश पिकलमुंडेवर लाखोंची बोली, बंगाल वॉरियर्सकडून खेळणार

हेही वाचा - ENG vs IND: भारत-इंग्लंड कसोटी मालिकेबाबत प्रशिक्षक रवी शास्त्रींची मोठी प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.