बंगळुरु : भारत विरुद्ध श्रीलंका ( India v Sri Lanka ) संघात कसोटी मालिकेती दुसरा कसोटी सामना जो पिंक बॉल कसोटी असणार आहे. या सामन्याला शनिवारी बंगळुरु येथे सुरुवात होणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उपकर्णधार जसप्रीत बुमराह ( Vice captain Jaspreet Bumarah ) म्हणाला, गुलाबी चेंडूच्या कसोटीपूर्वी क्रिकेटपटूंना काही मानसिक समायोजन करण्याची गरज आहे.
-
#TeamIndia vice-captain @Jaspritbumrah93 on the mental changes that need to be made for a Pink Ball Test.@Paytm #INDvSL pic.twitter.com/PCfrY6sJe7
— BCCI (@BCCI) March 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#TeamIndia vice-captain @Jaspritbumrah93 on the mental changes that need to be made for a Pink Ball Test.@Paytm #INDvSL pic.twitter.com/PCfrY6sJe7
— BCCI (@BCCI) March 11, 2022#TeamIndia vice-captain @Jaspritbumrah93 on the mental changes that need to be made for a Pink Ball Test.@Paytm #INDvSL pic.twitter.com/PCfrY6sJe7
— BCCI (@BCCI) March 11, 2022
पण त्यासाठी कोणतेही निकष निश्चित केलेले नाहीत. कारण त्यांनी यापूर्वीही वेगवेगळ्या परिस्थितीत दिवस-रात्र सामने खेळले आहेत. शनिवारपासून सुरू होणारी दुसरी भारत-श्रीलंका कसोटी गुलाबी चेंडूची असेल आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने 100 टक्के प्रेक्षकांना आधीच परवानगी ( 100 percent audience allowed ) दिली आहे.
कोलकाता (नोव्हेंबर 2019) आणि अहमदाबाद (फेब्रुवारी 2021) येथे इंग्लंड विरुद्धच्या सामन्यांनंतर घरच्या मैदानावर भारताची ही तिसरी डे-नाईट ( Third Day-Night Test ) गुलाबी चेंडू कसोटी असेल. भारताने या दोन्ही कसोटी तीन दिवसांत जिंकल्या. बुमराहने नमूद केले की तो गुलाबी चेंडूने जास्त खेळला नाही आणि तरीही दिवस-रात्र कसोटी सामने कसे खेळायचे ते शिकत आहे.
गुलाबी चेंडूच्या कसोटीसाठी आवश्यक असलेल्या विशिष्ट तयारीबद्दल विचारले असता बुमराह म्हणाला, “हे सर्व व्यक्तीवर अवलंबून असते. व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून आम्हाला लवकरात लवकर जुळवून घेण्याची गरज आहे. क्षेत्ररक्षण करताना गुलाबी चेंडू वेगळाच दिसतो. वेगवान गोलंदाज म्हणाला की तो त्याचा अनुभव वापरण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर काम करतो.
त्यामुळे तुम्ही जो काही थोडाफार अनुभव मिळवला आहे आणि जो फिडबॅक मिळालेला आहे, तुम्ही आमच्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर काम करत आहोत, असे तो म्हणाला. मोहालीतील पहिल्या कसोटीत भारताने तीन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजांना संधी दिली होती. पण खेळाची वेगवेगळी परिस्थिती पाहता गुलाबी चेंडूच्या सामन्यासाठी संघाच्या रणनीतीत बदल होऊ शकतो.