लंडन : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ( Fast bowler Jaspreet Bumrah ) 'द केनिंग्टन ओव्हल' येथे खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 7.2 षटकात 19 धावांत 6 गडी बाद केले. त्याने सर्वोत्तम गोलंदाजी करताना अनेक विक्रम मोडीत काढले, त्यात फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचा इंग्लंडविरुद्ध 6/25 धावांचा विक्रम ( Jaspreet Bumraha broke Kuldeep record ) होता.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान गोलंदाज बुमराहने इंग्लंडच्या फलंदाजांवर भारी पडला. त्याने इंग्लंडच्या फलंदाजीला सुरुंग लावत सहा विकेट घेतल्या. यादरम्यान इंग्लंडचा संघ 25.2 षटकांत गारद झाला आणि 110 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच वेळी, बुमराह इंग्लंडमध्ये वनडेमध्ये सहा विकेट घेणारा ( Bumrah take six wickets in ODI ) पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला.
-
For his exemplary bowling display, @Jaspritbumrah93 bags the Player of the Match award as #TeamIndia beat England in the first #ENGvIND ODI. 🙌 🙌
— BCCI (@BCCI) July 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard ▶️ https://t.co/8E3nGmlNOh pic.twitter.com/Ybj15xJIZh
">For his exemplary bowling display, @Jaspritbumrah93 bags the Player of the Match award as #TeamIndia beat England in the first #ENGvIND ODI. 🙌 🙌
— BCCI (@BCCI) July 12, 2022
Scorecard ▶️ https://t.co/8E3nGmlNOh pic.twitter.com/Ybj15xJIZhFor his exemplary bowling display, @Jaspritbumrah93 bags the Player of the Match award as #TeamIndia beat England in the first #ENGvIND ODI. 🙌 🙌
— BCCI (@BCCI) July 12, 2022
Scorecard ▶️ https://t.co/8E3nGmlNOh pic.twitter.com/Ybj15xJIZh
बुमराहच्या गोलंदाजीनंतर फलंदाज रोहित शर्मा ( Batsman Rohit Sharma ) आणि शिखर धवन यांच्यातील भागीदारीमुळे भारताने 10 गडी राखून सामना जिंकला. संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. तसेच, बुमराहने एकदिवसीय सामन्यांमध्ये तिसरा सर्वोत्तम आकडा नोंदवला, जो स्टुअर्ट बिन्नी (6/4) आणि अनिल कुंबळे (6/12) नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयसीसीनुसार, तो वनडेमध्ये एका डावात सहा विकेट घेणाऱ्या 10 भारतीय गोलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे.
हेही वाचा - Eng Vs Ind 1st Odi : रोहित शर्माच्या षटकाराने जखमी झाली चिमुरडी, पहा व्हिडिओ