ETV Bharat / sports

WPL 2023 : मुंबई इंडियन्सची महिला आयपीएलमध्ये धडाक्याने सुरुवात, गुजरातचा उडवला धुव्वा!

महिला प्रीमियर लीगच्या सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सवर मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. कर्णधार हरमनप्रीतच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर मुंबईने 207 धावांची मजल मारली. प्रत्युतरात, गुजरातचा संघ केवळ 64 धावांवर गारद झाला.

Mumbai Indians Vs Gujarat Giants
मुंबई इंडियंस विरुद्ध गुजरात जायंट्स
author img

By

Published : Mar 5, 2023, 7:14 AM IST

मुंबई : मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सची दारूण पराभव केला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबईने गुजरातवर 143 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. हा महिला टी 20 इतिहासातील धावांच्या फरकाने नोंदवलेला सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वीचा विक्रम वेलिंग्टन महिला संघाच्या नावावर होता, ज्यांनी २४ जानेवारी रोजी वेलिंग्टन येथे ओटागो महिला संघाचा 122 धावांनी पराभव केला होता.

हरमनप्रीतची कप्तानी खेळी : प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने पाच गडी गमावून 207 धावांची मजल मारली. कर्णधार हरमनप्रीत कौरने 22 चेंडूत अर्धशतक झळकावून आघाडीचे नेतृत्व केले. स्नेह राणाने तिला बाद करण्यापूर्वी तिने 30 चेंडूत 14 चौकारांसह 65 ठोकल्या होत्या. हेली मॅथ्यूजने 31 चेंडूत 47 धावा करत मुंबईच्या डावाला आकार दिला. तर अमेलिया केरने 24 चेंडूत नाबाद 45 धावा करत संघाची धावसंख्या 200 च्या पार नेली. तिने हरमनप्रीतसोबत 89 धावांची भागीदारीही केली. इस्‍सी वोंगने स्नेह राणाला शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून मुंबईचा डावाचा दिमाखात अंत केला. राणाने 43 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या.

अमेलिया केरची दुहेरी कामगिरी : धावांचा पाठलाग करताना जायंट्सची 7.4 षटकांत 7 बाद 23 अशी अवस्था झाली होती. महिला टी 20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ऍश गार्डनरकडून संघाला खूप अपेक्षा होत्या, पण इस्सी वोंगने तिला शून्य धावांवर तंबूत परत पाठवले. फलंदाजीत आपली चुणूक दाखवल्यानंतर अमेलिया केरने गोलंदाजीतही अप्रतिम कामगिरी केली. तिने आपल्या पहिल्याच षटकात एकही धाव न देता दोन बळी घेतले. तर डावखुरी फिरकीपटू सायका इशाकने 11 धावांत 4 बळी घेतले. गुजरातकडून दयालन हेमलताने 23 चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांसह 29 धावा केल्या, परंतु तिचे हे प्रयत्न संघाला विजयाच्या समिप पोहचवण्यास अपूरे ठरले.

हेही वाचा : Shane Warne Death Anniversary : शेन वॉर्नच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त सचिनने केली भावनिक पोस्ट, म्हणाला..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.