ETV Bharat / sports

Virat Kohli Century Record : विराटने आयपीएलमध्ये ख्रिस गेलचा रेकॉर्ड  मोडून रचला इतिहास - ख्रिस गेलचा रेकॉर्ड

विराट कोहलीने रविवारी बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध 7वे शतक ठोकले. विराटने ख्रिस गेलचा सर्वाधिक आयपीएल शतकांचा विक्रम मोडीत काढला. कोहलीने 60 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकारासह शतकाचा टप्पा गाठला.

Virat Kohli
विराट कोहली
author img

By

Published : May 22, 2023, 11:01 AM IST

मुंबई : विराट कोहलीने आरसीबीच्या शेवटच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शतक ठोकले होते. कोहलीने सर्वाधिक सहा शतके झळकावणाऱ्या खेळाडू ख्रिस गेलचा विक्रम मोडला. जोस बटलर आणि शिखर धवन यांच्या पावलावर पाऊल ठेवत कोहली सलग आयपीएल शतके नोंदवणारा तिसरा फलंदाज ठरला.

आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके :

  1. 7 - विराट कोहली
  2. 6 - ख्रिस गेल
  3. 5 - जोस बटलर

बॅट टू बॅक आयपीएल शतके :

1. 2 - शिखर धवन (DC, 2020)

2. 2 - जोस बटलर (RR, 2022)

3. 2 - विराट कोहली (RCB, 2023)

विराटने 600 हून अधिक धावाही नोंदवल्या : भारत आणि आरसीबीच्या माजी कर्णधार विराटने आयपीएल 2023 हंगामात 600 धावांचा टप्पा ओलांडला. 2016 मध्ये आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. 34 वर्षीय विराटने 2013 च्या मोसमात 600 हून अधिक धावाही नोंदवल्या होत्या.

  • Virat is there when we need him!

    — AB de Villiers (@ABdeVilliers17) May 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एबी डिव्हिलियर्सची शानदार प्रतिक्रिया : आरसीबी 'हॉल ऑफ फेमर' एबी डिव्हिलियर्सनेही कोहलीच्या शतकानंतर ट्विट केले आणि म्हटले की, जेव्हा आरसीबीला सर्वात जास्त गरज असते तेव्हा माजी कर्णधार नेहमीच तिथे असतो.

गेलची शानदार प्रतिक्रिया : आरसीबीच्या या माजी खेळाडूने आरसीबीच्या खेळीनंतर प्रतिक्रिया दिली. विराट कोहलीबद्दल कधीही शंका घेऊ नका. अप्रतिम खेळी, तुम्हाला माहिती आहे. त्याने आपल्या संघाला विजयी स्थितीत आणले आहे. विराट आणि फॅफने खरोखरच चांगली फलंदाजी केली, पण हे सर्व विराट कोहलीबद्दल होते... विराटची शानदार खेळी. मी निवृत्तीनंतर परत येत आहे आणि मी पुढच्या वर्षी विराटला भेटेन, असे गेल म्हणाला.

हेही वाचा : 1. IPL 2023 : गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचा 6 विकेटने पराभव केला

2. IPL 2023 : मुंबईचा हैदराबादवर 8 गडी राखून विजय, कॅमेरून ग्रीनने ठोकले टी-20 मधील पहिले शतक

3. IPL 2023 : ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये डु प्लेसिसला पछाडणे कठीण, पर्पल कॅपसाठी चुरस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.