ETV Bharat / sports

Virat Kohli batting Tips to Yashasvi : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात यशस्वी यादवला फलंदाजीचे 'विराट' धडे - IPL2023

आयपीएल सामन्यादरम्यान विराट कोहलीने राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालला फलंदाजीचे धडे दिले. रविवारी खेळवण्यात आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या संघाच्या सामन्यातील हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे.

Virat Kohli batting Tips to Yashasvi
संपादित छायाचित्र
author img

By

Published : May 15, 2023, 3:00 PM IST

नवी दिल्ली : सध्या आयपीएलचा IPL2023 हंगाम सुरू असून रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. यावेळी राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वालला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीने बॅटींगच्या खास टीप्स दिल्या. यावेळी विराट कोहली हा यशस्वी जैस्वालसोबत संवाद साधताना दिसला. त्यांच्या या संवादाचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमात चांगलाच व्हायरल होत आहे.

विराट कोहलींनी दिल्या बॅटींग टीप्स : यशस्वी जैस्वाल हा राजस्थान रॉयल्सचा सलामीर फलंदाज आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात रविवारी सामना खेळवण्यात आला. यावेळी विराट कोहलीने यशस्वी जैस्वालला फलंदाजीच्या कौशल्यावर काही टीप्स दिल्या. यावेळी कोणत्या बॉलवर कोणता शॉट निवडायचा, या तंत्राविषयी विराट कोहली यशस्वी जैस्वालसोबत बोलताना दिसत आहे. सामना संपल्यानंतर विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांच्या संवादाचा हा व्हिडिओ सोशल माध्यमात चांगलाच व्हायरल झाला.

यशस्वीला भोपळाही फोडता आला नाही : विराट कोहली यशस्वीला फलंदाजीच्या टिप्स देत असून भविष्यासाठी काही सल्ला देत असल्याचे सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत होते. राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने या आयपीएल हंगामात धमाकेदार फलंदाजी केली आहे. राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक धावा करून यशस्वीने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसरे स्थान राखले आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 13 सामन्यांमध्ये 575 धावा केल्या आहेत. यशस्वीने कोलकाता सामन्यात 98 धावांची नाबाद खेळी केली आहे. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात यशस्वीला खातेही उघडता आले नाही.

हेही वाचा -

  1. Virat Kohli Instagram Post : राजस्थान विरुद्धच्या मॅचपूर्वी विराट कोहलीने इंस्टाग्रामवर केला 'हा' फोटो शेअर, म्हणाला..
  2. IPL 2023 : आरसीबीकडून राजस्थानचा दारूण पराभव, अवघ्या 59 धावांवर संघ ऑलआऊट
  3. IPL 2023 : CSK Vs DC: चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सवर 27 धावांनी विजय, रविंद्र जडेजा ठरला सामनावीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.