ETV Bharat / sports

IPL 2023 : रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा हैदराबादवर 14 धावांनी विजय - सनराइजर्स हैदराबाद

2023 च्या 16 व्या हंगामातील 25 वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. ज्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी केली. मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 5 विकेट गमावत 192 धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादचा डाव 19.5 षटकांत 178 धावांत आटोपला. त्यामुळे मुंबई इंडियन्सने 14 धावांनी विजय मिळवला.

IPL 2023
सनराइजर्स हैदराबाद विरूद्ध मुंबई इंडियंस
author img

By

Published : Apr 18, 2023, 1:15 PM IST

Updated : Apr 19, 2023, 12:06 AM IST

हैदराबाद : हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर आज सनराईज हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 192 धावा केल्या आणि हैदराबादसमोर विजयासाठी 193 धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र, सनरायझर्स हैदराबादला हे लक्ष्य गाठता आले नाही. हैदराबादला 19.5 षटकांत केवळ 178 धावा केल्या आणि मुंबई इंडियन्सने 14 धावांनी विजय मिळवला.

मुंबईच्या 20 षटकांत 192 धावा : प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत 192 धावा केल्या. ज्यामध्ये रोहित शर्माने 28, इशान किशनने 38, कॅमेरून ग्रीनने नाबाद 64, सूर्यकुमार यादवने 7, तिलक वर्माने 37 तर टीम डेव्हिडने 16 धावा केल्या. प्रथम गोलंदाजी करताना हैदराबाद संघाने 20 षटकांत 5 गडी बाद केले. ज्यामध्ये भुवनेश्वर कुमारने 4 षटकात 1, मार्को जॉन्सनने 4 षटकात 2 , वॉशिंग्टन सुंदरने 4 षटकात 0 , टी नटराजनने 4 षटकात 1 आणि मयंक अग्रवालने 4 षटकात 0 विकेट घेतल्या.

सनरायझर्सची मधली फळी: सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये परतल्याने मुंबई इंडियन्सला थोडे बरे वाटले आहे, परंतु शीर्ष 3 फलंदाज एकत्र धावा करू शकले नाहीत. दुसरीकडे हॅरी ब्रूकच्या शतकानंतर सलग दोन विजयांमुळे हैदराबाद संघाच्या खेळाडूंचे मनोबल उंचावले आहे. हॅरी ब्रूकचा सलामीवीर म्हणून वापर करून सनरायझर्सने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सलामीवीर ब्रुक आणि एडन मार्कराम यांना मधल्या फळीत मदत करण्यासाठी अभिषेक शर्माच्या पुनरागमनामुळे सनरायझर्सची मधली फळी मजबूत दिसत आहे.

दोन्ही भाऊ वेगवेगळ्या संघात: मार्को जॅनसेन आणि डुआन जॅनसेन व्यावसायिक क्रिकेटमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतील. जुळा भाऊ डुआन जेन्सन मुंबई संघात आहे, तर मार्को हैदराबादकडून खेळतो. शेवटच्या 5 सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर हा आकडा मुंबईच्या बाजूने 3-2 असा आहे, परंतु दोन्ही संघांमधील शेवटचा सामना हैदराबादने 3 धावांच्या फरकाने जिंकला होता. ज्यामध्ये राहुल त्रिपाठीने 44 चेंडूत 76 धावांची खेळी केली होती.

मुंबई इंडियन्सची प्लेइंग 11 - रोहित शर्मा (कर्णधार) , ईशान किशन (विकेटकिपर), कॅमेरून ग्रीन, तिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, रायली मेरेडिथ, हृतिक शोकीन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ ; सनरायझर्स हैदराबादची प्लेइंग 11 - हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), अभिषेक शर्मा, मार्को यॅन्सन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, वॉशिंग्टन सुंदर.

गुणतालिकेतील स्थितीसाठी प्रयत्न : हैदराबाद येथे होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघ विजय मिळवून गुणतालिकेतील आपली स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतील. सध्या मुंबई इंडियन्स संघ 4 सामन्यात दोन विजयांसह आठव्या स्थानावर आहे, तर सनरायझर्स हैदराबादने 4 सामन्यात दोन विजय मिळवून 4 गुणही मिळवले आहेत. पण धावण्याच्या सरासरीच्या आधारे तो नवव्या क्रमांकावर आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघ जिंकण्याचा प्रयत्न करतील जेणेकरुन विजय मिळवून ते गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करतील. तसेच पहिल्या 4 संघांमध्ये आपले स्थान निश्चित करतील. यासोबतच दोन्ही संघ आपला धावगती सुधारण्याचा प्रयत्न करतील.

मुंबई इंडियन्स संघाची स्थिती : सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये परतल्यामुळे मुंबई इंडियन्स संघाची स्थिती थोडी बरी वाटत आहे, पण आघाडीचे तीन फलंदाज एकत्र धावा करू शकलेले नाहीत. दुसरीकडे हॅरी ब्रूकने झळकावलेल्या शतकानंतर सलग दोन विजयांमुळे हैदराबाद संघाच्या खेळाडूंचे मनोबल उंचावले आहे. हॅरी ब्रूकचा सलामीवीर म्हणून वापर करून सनरायझर्सने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सलामीवीर ब्रूक आणि एडन मार्कराम यांना मधल्या फळीत मदत करण्यासाठी अभिषेक शर्माच्या पुनरागमनामुळे सनरायझर्सची मधली फळी मजबूत दिसत आहे.

हे ही वाचा : IPL 2023 : आरसीबीमागे लागली पराभवाची पनवती, वाचा आव्हान टिकवण्यासाठी झहीर खानने काय दिला सल्ला

Last Updated : Apr 19, 2023, 12:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.