ETV Bharat / sports

Shreyas Iyer Injury : श्रेयस अय्यरच्या पाठीवर परदेशात होणार शस्त्रक्रिया, विश्वचषकात खेळणे अनिश्चित

मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरची दुखापत आता त्याला तीन मोठ्या स्पर्धांपासून दूर ठेवणार आहे. आयपीएलनंतर तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना तसेच 50 षटकांचा विश्वचषकही खेळू शकणार नाही.

Shreyas Iyer Injury
श्रेयस अय्यरची दुखापत
author img

By

Published : Apr 5, 2023, 3:26 PM IST

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर आता आयपीएलनंतर जून महिन्यात होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीला देखील मुकणार आहे. यासोबतच श्रेयसचे ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत देखील खेळणे कठीण झाले आहे.

5 ते 6 महिने क्रिकेटपासून दूर राहणार : बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरच्या पाठीवर आता परदेशात शस्त्रक्रिया होणार आहे. या शस्त्रक्रियेमुळे तो पुढील किमान 5 ते 6 महिने खेळाच्या मैदानापासून दूर राहणार आहे. तेथून परतल्यानंतर त्याला फिटनेस प्रक्रियेतून जावे लागेल. त्यानंतरच तो टीममध्ये खेळण्यासाठी फिट होईल. गेल्या महिन्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटी सामन्यात पाठदुखीमुळे तो टीमच्या बाहेर पडला होता. त्यानंतर तो एकदिवसीय मालिकेतही खेळू शकला नाही.

मागच्या सीझनमध्ये केकेआरने बनवले कर्णधार : कोलकाता नाईट रायडर्सने गेल्या आयपीएल हंगामात श्रेयस अय्यरला मोठी रक्कम देऊन आपल्या टीममध्ये शामिल करून घेतले होते. त्यानंतर त्याला टीमचे कर्णधारही बनवण्यात आले होते. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली पहिल्या सीझनमध्ये कोलकाताचे प्रदर्शन निराशाजनक राहिले. कोलकाता नाइट रायडर्सची टीम प्लेऑफ साठी देखील पात्र ठरू शकली नव्हती.

दिल्ली कॅपिटल्सचे देखील नेतृत्व केले आहे : श्रेयस अय्यरने दिल्लीसाठी एकूण 87 सामने खेळले असून त्यात 2375 धावा केल्या आहेत. त्याची फलंदाजी आणि नेतृत्वाच्या गुणवत्तेमुळेच केकआरने त्याचा संघात समावेश केला होता. त्याच्या अनुपस्थितीत या सीझनमध्ये नितीश राणा केकेआरचे नेतृत्व करतो आहे. श्रेयस अय्यर 2018, 2019 आणि 2020 मध्ये दिल्ली संघाचा कर्णधार होता. मात्र 2021 मध्ये दुखापतीमुळे त्याच्या जागी ऋषभ पंतला संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. त्यानंतर आता ऋषभ पंतच दिल्ली संघाचे नेतृत्व करतो आहे.

हे ही वाचा : Fastest 5000 Runs in IPL by Indians : माहीने आयपीएलमध्ये पूर्ण केल्या 5 हजार धावा, जाणून घ्या सर्वात कमी बॉलमध्ये पराक्रम करणारा खेळाडू कोण...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.