ETV Bharat / sports

''तू मिळवलेली...'', साराचा अर्जुनसाठी खास संदेश

author img

By

Published : Feb 20, 2021, 10:38 AM IST

साराने इंस्टाग्रामवरुन अर्जुनसोबतचा फोटो शेअर करत त्याचे अभिनंदन केले. तिने आपल्या स्टोरीवर दोन फोटो शेअर केले. त्यामधील पहिल्या फोटोला तिने कॅप्शन लिहिले, ''तू मिळवलेली ही उपलब्धी तुझ्याकडून कोणीही काढून घेऊ शकत नाही.'' तर, दुसऱ्या स्टोरीमध्ये तिने लिहिले, ''मला तुझा अभिमान वाटतो.''

sara-arjun
sara-arjun

मुंबई - भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदा आयपीएलचा पहिला मोसम खेळणार आहे. चेन्नईत पार पडलेल्या लिलावात अर्जुनला मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात सामील केले. २० लाखांच्या बेस प्राईजसह अर्जुन मुंबई संघात निवडला गेला. सचिनला मुलगा म्हणून लिलावात मुंबईच त्याच्यावर बोली लावणार असा अंदाज वर्तवला जात होता. त्यामुळे या लिलावानंतर अर्जुनवर अनेक तिखट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. मात्र, त्याची बहीण सारा तेंडुलकरने अर्जुनसाठी एक खास संदेश दिला आहे.

साराची स्टोरी

हेही वाचा - VIDEO : टीम इंडियाच्या 'स्पायडरमॅन'चा नवा अंदाज पाहिला का?

''आगामी आयपीएलसाठी स्वत: वर कठोर परिश्रम करण्याची गरज आहे'', असे मुंबई इंडियन्सच्या क्रिकेट ऑपरेशन्सचा संचालक झहीर खान सांगितले. तर, ''अर्जुनला वेळ देण्याची तसेच जास्त दबाव येणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. फक्त त्याला खेळ सुधारु दे आणि काय आपला मार्ग निवडू दे. आम्ही त्याच्या मदतीसाठी आहोतच'', असे मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धेनेने सांगितले आहे.

चेन्नईत झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकर, नॅथन कुल्टर-नाईल, जिमी नीशम, युधवीर चरक, मार्को जानसेन आणि पीयुष चावला यांना संघात घेतले. अर्जुन यापूर्वी देखील मुंबई इंडियन्स संघासोबत होता. तो गेल्या काही सत्रापासून मुंबई इंडियन्स संघात नेट बॉलरची भूमिका बजावत होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.