चेन्नई : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आपल्या गोलंदाजांच्या साधारण प्रदर्शनाने चिंतेत आहे. सीएसकेच्या गोलंदाजांनी आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांत खूप जास्त धावा दिल्या आहेत. यापैकी बहुतेक धावा वाइड आणि नोबॉलमधून आल्या आहेत. सोमवारी चेपॉक स्टेडियमवर 12 धावांनी विजय मिळविल्यानंतर तो म्हणाला की, चेन्नईच्या गोलंदाजांनी सामन्यामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त चेंडू टाकले. ही चिंतेची बाब आहे.
-
#CSK bowlers today bowled 13 wides and 3 no balls against #LSG and Captain @msdhoni, in his inimitable style, had this to say. 😁😆#TATAIPL | #CSKvLSG pic.twitter.com/p6xRqaZCiK
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#CSK bowlers today bowled 13 wides and 3 no balls against #LSG and Captain @msdhoni, in his inimitable style, had this to say. 😁😆#TATAIPL | #CSKvLSG pic.twitter.com/p6xRqaZCiK
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2023#CSK bowlers today bowled 13 wides and 3 no balls against #LSG and Captain @msdhoni, in his inimitable style, had this to say. 😁😆#TATAIPL | #CSKvLSG pic.twitter.com/p6xRqaZCiK
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2023
लखनऊ विरुद्ध तब्बल 18 अतिरिक्त धावा : चेन्नई सुपर किंग्जच्या वेगवान गोलंदाजांनी सोमवारी रात्री लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध तब्बल 13 वाईड आणि 3 नो - बॉल टाकले. गुजरात टायटन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांनी एकूण 12 अतिरिक्त धावा दिल्या होत्या. यात 6 लेग बाय, 2 नो बॉल आणि 4 वाईड बॉल होते. तर लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात संघाने एकूण 18 अतिरिक्त धावा दिल्या, ज्यात 2 लेग बाय, 3 नो बॉल आणि 13 वाईड बॉलचा समावेश होता.
दीपक चहरची खराब कामगिरी : सीएसकेचा अनुभवी गोलंदाज दीपक चहरने लखनऊ विरुद्धच्या सामन्यात पाच वाइड बॉल टाकले. या शिवाय तुषार देशपांडे आणि राजवर्धन हंगरगेकर या दोन अननुभवी गोलंदाजांनीही अतिरिक्त चेंडू टाकले. तुषार देशपांडेने दोन सामन्यांत पाच वाईड आणि चार नो - बॉल टाकले आहेत, तर हंगरगेकरने सहा वाईड आणि एक नो - बॉल टाकला आहे. यामुळे संघाच्या बाकी खेळाडूंवर दबाव वाढतो आहे.
धोनीचा गोलंदाजांना इशारा : धोनीने गोलंदाजांना इशारा दिला आहे की, वेगवान गोलंदाजांनी गोलंदाजीत थोडी सुधारणा करण्याची गरज आहे. त्यांना परिस्थितीनुसार गोलंदाजी करण्याची गरज समजून घ्यावी लागेल. त्यांना नो - बॉल आणि वाइड बॉल कमी टाकावे लागतील. आम्ही बरेच अतिरिक्त चेंडू टाकत आहोत. यासोबतच खेळात सुधारणा न झाल्यास कर्णधारपद सोडण्याचा इशाराही धोनीने दिला आहे.
हेही वाचा : IPL 2023 : पाहा ऑरेंज आणि पर्पल कॅप स्पर्धकांमधली शर्यत, कोणता संघ कोणत्या क्रमांकावर आहे ते जाणून घ्या