ETV Bharat / sports

मिस्टर 360 : एबी डिव्हिलियर्सची IPL मधून निवृत्ती

author img

By

Published : Nov 19, 2021, 3:07 PM IST

Updated : Nov 19, 2021, 5:49 PM IST

माझ्या भावंडांसोबत घराच्या अंगणात क्रिकेट खेळण्यापासून माझा प्रवास सुरू झाला होता. मी खेळाचा आनंद घेत क्रिकेट खेळलो. अनेकांनी मला प्रोत्साहित केले आणि मला चांगला खेळ करण्यासाठी प्रवृत्त केलं. पण आता वयाच्या ३७व्या वर्षी मी क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्त होत आहे, अशी माहिती AB de Villiers ने ट्वीट करून दिली.

AB de Villiers retires from the IPL
मिस्टर ३६०

हैदराबाद - दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ( International Cricket ) माघार घेतली होती. त्यानंतर आज (शुक्रवार) त्याने IPL मधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. क्रिकेटमधील माझा प्रवास खूपच छान होता. पण आता मी सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्याने ट्वीट करून सांगितले.

  • It has been an incredible journey, but I have decided to retire from all cricket.

    Ever since the back yard matches with my older brothers, I have played the game with pure enjoyment and unbridled enthusiasm. Now, at the age of 37, that flame no longer burns so brightly. pic.twitter.com/W1Z41wFeli

    — AB de Villiers (@ABdeVilliers17) November 19, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'३७व्या वर्षी मी क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्त होत आहे'

माझ्या भावंडांसोबत घराच्या अंगणात क्रिकेट खेळण्यापासून माझा प्रवास सुरू झाला होता. मी खेळाचा आनंद घेत क्रिकेट खेळलो. अनेकांनी मला प्रोत्साहित केले आणि मला चांगला खेळ करण्यासाठी प्रवृत्त केले. पण आता वयाच्या ३७व्या वर्षी मी क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्त होत आहे, अशी माहिती त्याने ट्वीट करून दिली.

संघाने दिलेली भूमिका पाडली पार -

२००४ मध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यातून डिव्हिलियर्सने पदार्पण केले होते. डिव्हिलियर्सने सलामीवीर म्हणून पदार्पण केले. त्याने मधल्या फळीतही खेळ केलेला आहे. टीमला जिथे गरज होती, तिथे डिव्हिलियर्सने फलंदाजी केली. टीमसाठी काही वेळा त्याने यष्टीमागे यष्टिरक्षकाची भूमिकाही पार पाडली होती.

सर्वात वेगवान शतक, अर्धशतकाचा विक्रम -

एबी डिव्हिलियर्सच्या नावावर सर्वात वेगवान शतक, अर्धशतक आणि 150 धावा करण्याचा विक्रम आहे. त्याने 16 चेंडूत 50 धावा, 31 चेंडूत शतक झळकावले होते. तसेच त्याने 44 चेंडूत १५० धावा केल्या होते. 2015 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ही खेळी खेळली होती.

हेही वाचा - Hardik Pandya : हार्दिक पंड्याची 5 कोटींची दोन घड्याळे जप्त; पंड्या म्हणाला...

Last Updated : Nov 19, 2021, 5:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.