ETV Bharat / sports

Mohammad Kaif On MS Dhoni Retirement : धोनीने शेवटचे आयपीएल असल्याचे दिले संकेत - मोहम्मद कैफ - MS dhoni latest news

टीम इंडियाचा माजी फिनिशर बॅट्समन आणि मैदानावरील उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी जगप्रसिद्ध असलेल्या मोहम्मद कैफने धोनीच्या आयपीएलमधून निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.त्याने म्हटले आहे की, धोनी पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये खेळणार नाही, असे मला वाटत आहे.

MS Dhoni
धोनी
author img

By

Published : May 15, 2023, 5:11 PM IST

नवी दिल्ली : कोलकाता नाइट रायडर्सने रविवारी चेन्नई सुपर किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्जची प्ले ऑफसाठी पात्र होण्याची शक्यता कमी झाली, आता चेन्नई सुपर किंग्जला बाद फेरीसाठी पात्र होण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स विरुद्धचा शेवटचा सामना जिंकावा लागेल.

धोनीने शेवटचा हंगाम असल्याचे संकेत दिले : चेन्नईतील अंतिम सामन्यापूर्वी भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी धोनीचा ऑटोग्राफ त्याच्या शर्टवर घेतला. यामुळे धोनीने त्याच्या आयपीएलच्या भविष्याबाबत काही संकेत दिले आहेत की काय अशी चर्चा सुरू झाली. चार वेळा आयपीएल विजेता कर्णधार धोनीने खेळाडू म्हणून हा शेवटचा हंगाम असल्याचे पुरेसे संकेत दिले आहेत, असा विश्वास माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफने व्यक्त केला. स्टार स्पोर्ट्सवर कैफ म्हणाला, 'मला वाटते एम. एस. धोनीने पुरेसे संकेत दिले आहेत की हे त्याचे शेवटचे आयपीएल आहे.

सुनील गावसकर यांनी धोनीची महानता दाखवली : धोनीने गावसकरच्या शर्टवर स्वाक्षरी केल्याच्या मूळ क्षणाबाबत कैफ म्हणाला, आम्ही सुनील गावसकर सरांना कोणत्याही क्रिकेटपटूचा ऑटोग्राफ घेताना पाहिले नाही. सुनील गावसकर सारखा महान खेळाडू धोनीचा शर्टवर ऑटोग्राफ घेऊन धोनीची महानता सांगतो. तसेच सामना संपल्यानंतर धोनीने चेपॉकमध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचे आभार मानले. त्यानंतर रिंकू सिंग आणि चक्रवर्तीच्या जर्सीवर ऑटोग्राफ दिला. तेथे त्यांनी स्टेडियमच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर संपूर्ण मैदानाला प्रदक्षिणा घालून संघाची जर्सी प्रेक्षकांना वाटण्यात आली.

1. हेही वाचा : IT Engineer Murder Case Pune: आयटी इंजिनियरची 3 हजार रुपयांसाठी केली हत्या; दोन आरोपींना अटक

2. हेही वाचा : Virat Kohli batting Tips to Yashasvi : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात यशस्वी यादवला फलंदाजीचे 'विराट' धडे

3. हेही वाचा : Ahmednagar News: अकोल्यापाठोपाठ शेवगावमध्ये शांततेला सुरुंग, दोन गटातील दगडफेकीनंतर १०२ जणांवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.