नवी दिल्ली : काल झालेल्या आयपीएलच्या 9 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने आरसीबीचा मोठ्या फरकाने पराभव केला. केकेआरच्या दिग्गज खेळाडूंनी हा विजय मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण या खेळाडूंशिवाय एक 19 वर्षीय नवख्या गोलंदाजाने सर्वांनाच प्रभावित केले. या गोलंदाजाने आयपीएलच्या पदार्पण सामन्यातच आरसीबीच्या फलंदाजांना नाकीनऊ आणले.
-
Kolkata Knight Riders have brought the impact player on the field!
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Suyash Sharma IN for Venkatesh Iyer.
Follow the match - https://t.co/J6wVwbsfV2#TATAIPL | #KKRvRCB pic.twitter.com/f65DZvFKCE
">Kolkata Knight Riders have brought the impact player on the field!
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2023
Suyash Sharma IN for Venkatesh Iyer.
Follow the match - https://t.co/J6wVwbsfV2#TATAIPL | #KKRvRCB pic.twitter.com/f65DZvFKCEKolkata Knight Riders have brought the impact player on the field!
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2023
Suyash Sharma IN for Venkatesh Iyer.
Follow the match - https://t.co/J6wVwbsfV2#TATAIPL | #KKRvRCB pic.twitter.com/f65DZvFKCE
पदार्पणाच्या सामन्यात 3 बळी घेतले : दिल्लीचा रहिवासी असलेला सुयश शर्मा केवळ 19 वर्षांचा आहे. 6 एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या 9 व्या सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली आहे. या सामन्यात कर्णधार नितीश राणाच्या कोलकाता नाईट रायडर्सने सुयशला पदार्पणाची संधी दिली. सुयशचा केकेआरच्या संघात इम्पॅप्ट प्लेअर म्हणून समावेश करण्यात आला होता. या सामन्यात सुयशने व्यंकटेश अय्यरची जागा घेतली आणि आपल्या पहिल्या सामन्यातच तो चमकला. आयपीएलच्या या सिझनमध्ये केकेआरच्या विजयाची मोहीम सुरू करण्यात सुयश शर्माची मुख्य भूमिका आहे. सुयशने आरसीबीविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात 3 बळी घेतले.
-
This is Suyash Sharma's #TATAIPL debut 👏
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Let's wish him luck ⤵️⤵️⤵️ pic.twitter.com/kO7CA7QYMR
">This is Suyash Sharma's #TATAIPL debut 👏
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 6, 2023
Let's wish him luck ⤵️⤵️⤵️ pic.twitter.com/kO7CA7QYMRThis is Suyash Sharma's #TATAIPL debut 👏
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 6, 2023
Let's wish him luck ⤵️⤵️⤵️ pic.twitter.com/kO7CA7QYMR
केकेआरने 20 लाख रुपयांना विकत घेतले : या सामन्यात आरसीबीच्या फलंदाजांना केकेआरच्या फिरकीपटूंचा सामना करता आला नाही. या 19 वर्षीय लेग - स्पिनरने आरसीबीच्या फलंदाजांवर आपल्या फिरकीची जादू टाकली. सुयश शर्माच्या गोलंदाजीत आरसीबीचे फलंदाज चांगलेच अडकले. सुयशने आरसीबीविरुद्ध चार षटके गोलंदाजी केली. या सामन्यात त्याने 30 धावा देऊन 3 बळी घेतले. सुयश शर्माने आरसीबीच्या अनुज रावत, कर्ण शर्मा आणि दिनेश कार्तिकला बाद केले. सुयशचा जन्म 15 मे 2003 रोजी झाला आहे. 2023 च्या आयपीएल लिलावात कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायझीने सुयश शर्माला केवळ 20 लाख रुपयांना विकत घेतले होते. सुयशनेही या सामन्यातील आपल्या कामगिरीने केकेआरचा दावा खरा ठरविला आहे.
-
Anuj Rawat ☑️
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Dinesh Karthik ☑️
Watch Suyash Sharma pick two quick wickets in his debut game.
Live - https://t.co/V0OS7tFZTB #TATAIPL #KKRvRCB #IPL2023 pic.twitter.com/3igG1jDWb4
">Anuj Rawat ☑️
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2023
Dinesh Karthik ☑️
Watch Suyash Sharma pick two quick wickets in his debut game.
Live - https://t.co/V0OS7tFZTB #TATAIPL #KKRvRCB #IPL2023 pic.twitter.com/3igG1jDWb4Anuj Rawat ☑️