ETV Bharat / sports

IPL Ticket Advisory : स्टेडियममध्ये प्रेक्षकाने वादग्रस्त पोस्टर लावल्यास होणार कडक कारवाई, जाणून घ्या आयपीएलचे नियम

आयपीएल 2023 चा सहावा सामना आज होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्जचा हा हंगामातील दुसरा सामना आहे.

IPL Ticket Advisory
स्टेडियममध्ये प्रेक्षकाने वादग्रस्त पोस्टर लावल्यास होणार कडक कारवाई
author img

By

Published : Apr 3, 2023, 11:01 AM IST

नवी दिल्ली : क्रिकेट चाहते आयपीएलचा आनंद लुटत आहेत. आपल्या आवडत्या संघाला चिअर करण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने स्टेडियमवर पोहोचत आहेत. सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी 'अयोग्य कृत्य' करू नये, म्हणून सामन्यांची तिकिटे विकणाऱ्या फ्रँचायझींनी अ‍ॅडव्हायझरी जारी केली आहे. स्टेडियममध्ये एखाद्या प्रेक्षकाने वादग्रस्त पोस्टर लावल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.

'पेटीएम इनसाइडर'ने एक चेतावणी जारी केली : बीसीसीआयच्या सूचनेनुसार हा इशारा देण्यात आला आहे. जे सामन्यांची तिकिटे विकतात. गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सच्या तिकीट भागीदार 'पेटीएम इनसाइडर'ने एक चेतावणी जारी केली आहे. ही चेतावणी पंजाबमधील मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन (PCA) स्टेडियम, दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम, तेलंगणातील हैदराबाद क्रिकेट स्टेडियम आणि अहमदाबाद, गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम यांना लागू होईल.

विरोध करणारे साहित्य स्टेडियममध्ये नेऊ नये : चेतावणी म्हणून, नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) ला विरोध करणारे साहित्य स्टेडियममध्ये नेऊ नये म्हणून चाहत्यांवर बंदी घालण्यात आली आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, ही सूचना सामन्यांची तिकिटे विकणाऱ्या फ्रँचायझीने जारी केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) सल्लामसलत केल्यानंतर हे करण्यात आले आहे.

सामन्यासाठी तिकीट देणे हा फ्रँचायझीचा अधिकार : दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (डीडीसीए) अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, सामन्यासाठी तिकीट देणे हा फ्रँचायझीचा अधिकार आहे. आम्ही फक्त सुविधा देणारे आहोत आणि त्यांना स्टेडियम देतो. तिकिटांच्या बाबतीत आमची भूमिका नाही. फिफा विश्वचषक 2022 दरम्यान काही देशांच्या खेळाडूंनी कतारमधील एका कायद्याला विरोध केला होता. निषेधार्थ खेळाडू 'वन लव्ह' आर्मबँड घालून मैदानात उतरले. जेव्हा फिफाने आर्म-बँड घातल्याबद्दल खेळाडूंना पिवळे कार्ड दाखवले, तेव्हा खेळाडूंनी आर्म बँड काढून टाकले.

हेही वाचा : IPL 2023 : आरसीबीने मुंबई इंडियन्सचा 8 विकेट्सने उडवला धुव्वा ; विराट, डु प्लेसिसने ठोकले धडाकेबाज अर्धशतक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.