नवी दिल्ली : आयपीएलच्या १५व्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा एका विकेटने पराभव केला. लखनौचा या मोसमातील हा चौथा विजय आहे. यासह लखनौ पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आले आहे. लखनौच्या विजयाचा हिरो ठरलेल्या निकोलस पूरनने मोसमातील सर्वात जलद अर्धशतक झळकावत 19 चेंडूत 62 धावा केल्या.
-
𝗪𝗛𝗔𝗧. 𝗔. 𝗚𝗔𝗠𝗘 🤯🤯🤯@LucknowIPL pull off a last-ball win!
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A roller-coaster of emotions in Bengaluru 🔥🔥
Follow the match ▶️ https://t.co/76LlGgKZaq#TATAIPL | #RCBvLSG pic.twitter.com/96XwaYaOqT
">𝗪𝗛𝗔𝗧. 𝗔. 𝗚𝗔𝗠𝗘 🤯🤯🤯@LucknowIPL pull off a last-ball win!
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2023
A roller-coaster of emotions in Bengaluru 🔥🔥
Follow the match ▶️ https://t.co/76LlGgKZaq#TATAIPL | #RCBvLSG pic.twitter.com/96XwaYaOqT𝗪𝗛𝗔𝗧. 𝗔. 𝗚𝗔𝗠𝗘 🤯🤯🤯@LucknowIPL pull off a last-ball win!
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2023
A roller-coaster of emotions in Bengaluru 🔥🔥
Follow the match ▶️ https://t.co/76LlGgKZaq#TATAIPL | #RCBvLSG pic.twitter.com/96XwaYaOqT
विराटच्या 44 चेंडूत 61 धावा : निकोलसने या खेळीत 4 चौकार आणि 7 षटकार मारले. मार्कस स्टॉइनिसने 30 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांसह 65 धावा केल्या. आयुष बडोनी 24 चेंडूत 30 धावा केल्यानंतर हिट विकेट झाला. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स संघाने 2 गडी गमावून 212 धावा केल्या. विराट कोहलीने 44 चेंडूत 61 धावा, ग्लेन मॅक्सवेलने 29 चेंडूत 59 धावा आणि आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने 46 चेंडूत 79 धावांची नाबाद खेळी केली.
निकोलसची तुफानी खेळी : लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौने 9 गडी गमावून 213 धावा करून सामना जिंकला. लखनौ फ्रँचायझीच्या मार्क वुड आणि अमित मिश्राने 1-1 विकेट घेतली. केएल राहुलचा संघ सुरुवातीपासूनच डळमळला. मात्र नंतर निकोलस पूरनने 62 धावांची तुफानी खेळी करत सामन्याचे चित्रच फिरवले. यासाठी त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देण्यात आला आहे.
-
Awaiting another intense showdown tonight. CAN'T. WAIT! 🔥
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Bengaluru, are you ready? 🤩#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2023 #RCBvLSG pic.twitter.com/cc9QZmSTrK
">Awaiting another intense showdown tonight. CAN'T. WAIT! 🔥
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 10, 2023
Bengaluru, are you ready? 🤩#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2023 #RCBvLSG pic.twitter.com/cc9QZmSTrKAwaiting another intense showdown tonight. CAN'T. WAIT! 🔥
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 10, 2023
Bengaluru, are you ready? 🤩#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2023 #RCBvLSG pic.twitter.com/cc9QZmSTrK
लखनौला आठवा धक्का : मार्क वुडने एक धाव घेतली आणि २०९ धावांच्या स्कोअरवर लखनौची आठवी विकेट पडली. मार्क वुड एक धाव काढून बाद झाला. मार्क वुडला हर्षल पटेलने क्लीन बोल्ड केले. 206 धावांवर लखनौ सुपरजायंट्सला सातवा धक्का बसला. आयुष बडोनी 24 चेंडूत 30 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
सुरुवात अडखळत : 213 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सची सुरुवात अडखळतसुरुवात अडखळतझाली. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला काइल मेअर्स या सामन्यात मात्र काही कमाल दाखवू शकला नाही. त्याला शुन्याच्या स्कोरवर मोहम्मद सिराजने क्लीन बोल्ड केले. लखनऊच्या 4 षटकांत 23 - 3 धावा झाल्या. लखनऊला विजयासाठी 16 षटकांत आणखी 190 धावांची आवश्यकता होती.
धडाकेबाज फलंदाजी : प्रथम फलंदाजी करताना आरसीबीच्या फलंदाजांनी धडाकेबाज फलंदाजी केली. बंगळुरूकडून विराट कोहली, कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल या आघाडीच्या तीनही फलंदाजांनी अर्धशतक ठोकले. आरसीबीच्या 20 षटकांत 212 धावा झाल्या. लखनऊला विजयासाठी 213 धावांचे लक्ष होते.
-
Kaptaan Sahab loves taking on 𝑹𝒐𝒚𝒂𝒍 𝒄𝒉𝒂𝒍𝒍𝒆𝒏𝒈𝒆𝒔 💪#RCBvLSG | #IPL2023 | #LucknowSuperGiants | #LSG | #GazabAndaz pic.twitter.com/CDeAoeGw37
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Kaptaan Sahab loves taking on 𝑹𝒐𝒚𝒂𝒍 𝒄𝒉𝒂𝒍𝒍𝒆𝒏𝒈𝒆𝒔 💪#RCBvLSG | #IPL2023 | #LucknowSuperGiants | #LSG | #GazabAndaz pic.twitter.com/CDeAoeGw37
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 10, 2023Kaptaan Sahab loves taking on 𝑹𝒐𝒚𝒂𝒍 𝒄𝒉𝒂𝒍𝒍𝒆𝒏𝒈𝒆𝒔 💪#RCBvLSG | #IPL2023 | #LucknowSuperGiants | #LSG | #GazabAndaz pic.twitter.com/CDeAoeGw37
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 10, 2023
5 चौकार आणि 5 षटकार : विराट बाद घाल्यावर कर्णधार फाफ डू प्लेसिसने सामन्याची सुत्रे आपल्या हाती घेतली. विराटनंतर त्यानेही शानदार अर्धशतक साजरे केले. त्याने 46 चेंडूत नाबाद 79 धावा केल्या. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 5 षटकार ठोकले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला ग्लेन मॅक्सवेलनेही आपल्या नावाला अनुरुप जोरदार फटकेबाजी केले. त्याने 3 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने 29 चेंडूत 59 धावा केल्या. त्याला मार्क वूडने शेवटच्या षटकात बोल्ड केले.
दोन्ही संघाची प्लेइंग 11 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अनुज रावत, डेव्हिड विले, वेन पार्नेल, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज
लखनऊ सुपर जायंट्स - केएल राहुल, काइल मेयर्स, दीपक हुड्डा, मार्कस स्टॉयनिस, क्रुनाल पंड्या, निकोलस पूरन, जयदेव उनाडकट, अमित मिश्रा, आवेश खान, मार्क वूड, रवि बिश्नोई.
राहुलला रोखण्याचे आव्हान : या आयपीएल हंगामातील दोन्ही संघांच्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, लखनऊ सुपर जायंट्सने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 2 पैकी 1 सामना जिंकला आहे. कागदावर दोन्ही संघ बलाढ्य आहेत. अशा स्थितीत या दोन्ही संघांमध्ये अत्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र, हा सामना जिंकण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार के. एल. राहुलला लवकरात लवकर बाद करावे लागेल. आरसीबीविरुद्ध के. एल. राहुलचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. आत्तापर्यंत आरसीबीविरुद्धच्या सामन्यात राहुलच्या बॅटमधून भरपूर धावा निघाल्या आहेत.
आरसीबीविरुद्ध राहुलचा रेकॉर्ड : जेव्हा जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध सामना असतो तेव्हा तेव्हा के. एल. राहुलची बॅट चांगलीच तळपली आहे. राहुलने आरसीबीविरुद्ध आत्तापर्यंत 13 सामने खेळले आहेत. या 13 सामन्यांच्या 12 डावात फलंदाजी करताना राहुलने 76.25 च्या सरासरीने एकूण 610 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 अर्धशतके आणि 1 शतकाचाही समावेश आहे. राहुलची आरसीबीविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 132 आहे. आरसीबीविरुद्ध राहुलचा स्ट्राइक रेटही 147.69 एवढा आहे.
शेवटच्या 7 डावात 474 धावा : के. एल. राहुलने आरसीबीविरुद्ध गेल्या 7 डावात 67.71 च्या सरासरीने एकूण 474 धावा केल्या आहेत. या दरम्यान तो तीनदा नाबाद राहिला आहे. गेल्या सात डावांमध्ये राहुलने 79, 30, 39, नाबाद 91, नाबाद 61, नाबाद 132 आणि 42 धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यातही के. एल. राहुलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
हे ही वाचा : IPL 2023 : सलग पाच चेंडूंवर पाच षटकार, रिंकू सिंगला मिळाला 'हा' खिताब, एका रात्रीत ठरला आयपीएलचा हिरो