मुंबई: शनिवारी, इंडियन प्रीमियर लीग 2023 चा दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. कर्णधार रोहित शर्माने घरच्या मैदानावर पुन्हा एकदा विजयी मालिका सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. पंजाब किंग्जने दिलेल्या 215 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग मुंबई इंडियन्सला करता आला नाही. आणि पंजाब किंग्जने 12 धावांनी विजय मिळवला.
-
Nerves of steel!@arshdeepsinghh defends 16 in the final over and @PunjabKingsIPL register a 13-run win in Mumbai 👏👏
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard ▶️ https://t.co/FfkwVPpj3s #TATAIPL | #MIvPBKS pic.twitter.com/twKw2HGnBK
">Nerves of steel!@arshdeepsinghh defends 16 in the final over and @PunjabKingsIPL register a 13-run win in Mumbai 👏👏
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2023
Scorecard ▶️ https://t.co/FfkwVPpj3s #TATAIPL | #MIvPBKS pic.twitter.com/twKw2HGnBKNerves of steel!@arshdeepsinghh defends 16 in the final over and @PunjabKingsIPL register a 13-run win in Mumbai 👏👏
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2023
Scorecard ▶️ https://t.co/FfkwVPpj3s #TATAIPL | #MIvPBKS pic.twitter.com/twKw2HGnBK
मुंबईला 215 धावांचे लक्ष्य : पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 215 धावांचे लक्ष्य दिले. पंजाब किंग्जने 20 षटकांत 8 गडी गमावून 214 धावा केल्या. पंजाबच्या सॅम करनने 29 चेंडूत 55 धावा केल्या. याशिवाय हरप्रीत सिंगने 28 चेंडूत 41 धावा केल्या. त्याचवेळी, जितेश शर्माने शानदार खेळी केली. जितेशने 7 चेंडूत 25 धावा केल्या. यासोबतच अथर्व तावडेनेही शानदार फलंदाजी करताना 17 चेंडूत 29 धावा केल्या. मुंबईकडून पियुष चावलाने 3 षटकात 15 धावा देत 2 बळी घेतले. याशिवाय कॅमेरून ग्रीनने 4 षटकांत 41 धावा देत 2 बळी घेतले. तर जोफ्रा आर्चर, जेसन बेहरेनडॉर्फ आणि अर्जुन तेंडुलकर यांनी प्रत्येकी एक बळी घेतले.
दोन्ही संघाची घौडदौड : मुंबई इंडियन्स संघ सध्या आयपीएलच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. आजचा सामना जिंकून आणखी 2 गुण मिळविण्याचा प्रयत्न केला आणि 8 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या संघांमध्ये आपले स्थान निश्चित करण्याचे प्रयत्न केले पण त्याला यश आले नाही. दुसरीकडे पंजाब संघाने गेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून झालेला 24 धावांचा पराभव विसरून आपली गाडी पुन्हा विजयी मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला.
-
.@arshdeepsinghh claimed a terrific four-wicket haul against #MI and he becomes our 🔝 performer from the second innings of the #MIvPBKS contest in the #TATAIPL 👏👏
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A look at his bowling summary 🔽 pic.twitter.com/UiaToSlEE6
">.@arshdeepsinghh claimed a terrific four-wicket haul against #MI and he becomes our 🔝 performer from the second innings of the #MIvPBKS contest in the #TATAIPL 👏👏
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2023
A look at his bowling summary 🔽 pic.twitter.com/UiaToSlEE6.@arshdeepsinghh claimed a terrific four-wicket haul against #MI and he becomes our 🔝 performer from the second innings of the #MIvPBKS contest in the #TATAIPL 👏👏
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2023
A look at his bowling summary 🔽 pic.twitter.com/UiaToSlEE6
पॉइंट टेबलमधील स्थान: जर आपण आयपीएलच्या पॉइंट्स टेबलवर नजर टाकली तर, हे ज्ञात आहे की पंजाब संघाने 6 सामन्यांतून तीन विजय आणि तीन पराभवांसह एकूण 6 गुण जमा केले आहेत आणि सध्या ते सातव्या स्थानावर आहेत. गेल्या दोन सामन्यांमध्ये शिखर धवनच्या अनुपस्थितीमुळे पंजाब संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. शिखर धवनच्या अनुपस्थितीत पंजाबने लखनौमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला, पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पराभव पत्करावा लागला.
मुंबईचा फलंदाजी फोकस: आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सचा आतापर्यंतचा प्रवास फलंदाजीवर अवलंबून आहे. कागदावर भक्कम दिसत असल्याने संघाला कॅमेरून ग्रीन आणि सूर्यकुमार यादव यांच्याकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा असेल. रोहित शर्माही लांब डाव खेळू शकत नाही, तो झटपट धावा करण्याच्या प्रक्रियेत विकेट गमावून संघावर दबाव टाकत असल्याचे चित्र आहे.
-
16 runs. 6 balls
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Who wins this one folks? #TATAIPL | #MIvPBKS pic.twitter.com/2ch14QNIbH
">16 runs. 6 balls
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2023
Who wins this one folks? #TATAIPL | #MIvPBKS pic.twitter.com/2ch14QNIbH16 runs. 6 balls
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2023
Who wins this one folks? #TATAIPL | #MIvPBKS pic.twitter.com/2ch14QNIbH
रोहित - ग्रीनची भागीदारी : मुंबईकडून सलामीला आलेला ईशान किशन या सामन्यात आपली छाप सोडू शकला नाही. त्याला 1 च्या स्कोरवर अर्शदीप सिंगने बाद केले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कॅमरून ग्रीनने कर्णधार रोहित शर्मासोबत मिळून मुंबईच्या डावाला आकार दिला. या दोघांमध्ये अर्धशतकीय भागीदारी झाली. रोहितला 44 च्या स्कोरवर लिव्हिंगस्टोनने स्वत:च्या गोलंदाजीत झेलबाद केले. त्यानंतर कॅमरून ग्रीनने सामन्याची सुत्रे आपल्या हाती घेतली. त्याने 43 चेंडूत 67 धावांची स्फोटक खेळी केली. त्याला नॅथन इलिसने सॅम करनच्या हाती झेलबाद केले.
सॅम करन - भाटियाने सांभाळला डाव : पंजाबचा सलामीवीर मॅथ्यू शॉर्ट स्वस्तात बाद झाला. त्याने 10 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 11 धावा केल्या. त्याला कॅमरून ग्रीनने पियुष चावलाच्या हाती झेलबाद केले. पंजाबचा कर्णधार सॅम करन आणि हरप्रीत सिंग भाटियाने भागिदारी रचत डाव सांभाळला. सॅम करनने 29 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. तर भाटियाने 28 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 41 धावा केल्या. मुंबईकडून कॅमरून ग्रीन आणि पियुष चावलाने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
मुंबई इंडियन्सची प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, पियुष चावला, जोफ्रा आर्चर, जेसन बेहरेनडॉर्फ ; बदली खेळाडू - नेहल वढेरा, शम्स मुलानी, विष्णू विनोद, कार्तिकेय सिंग.
पंजाब किंग्सची प्लेइंग 11 : अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया, लियाम लिव्हिंगस्टन, सॅम करन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, अर्शदीप सिंग ; बदली खेळाडू - नॅथन इलिस, मोहित राठी, सिकंदर रझा, ऋषी धवन, गुरनुर ब्रार
हे ही वाचा : MS Dhoni With SRH Team : माहीने दिल्या हैदराबादच्या युवा खेळाडूंना टिप्स, पहा व्हिडिओ