ETV Bharat / sports

IPL 2023 : कोलकाता नाईट रायडर्सचा चेन्नई सुपर किंग्ज कडून 49 धावांनी पराभव - win by 49 runs

आयपीएल 2023 च्या 16 व्या सिजनमधील 33 वा सामना रविवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना CSK संघाने 20 षटकांत 4 गडी गमावून 235 धावा केल्या. उच्च धावसंख्येच्या सामन्यात कोलकाताला 236 धावांचे लक्ष्य देण्यात आले. प्रत्युत्तरात कोलकाताने 20 षटकांत 8 गडी गमावून 186 धावा केल्या.चेन्नई सुपर किंग्जने 49 धावांनी विजय मिळवला.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Apr 23, 2023, 7:21 PM IST

Updated : Apr 24, 2023, 12:08 AM IST

कोलकाता : टाटा आयपीएल 2023 चा 33 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने नितीश राणाच्या कोलकाता नाईट रायडर्सचा 49 धावांनी पराभव केला. हा सामना जिंकल्यानंतरही धोनीचा संघ पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आला आहे आणि कोलकाता 8व्या क्रमांकावर आहे.

चेन्नई अव्वल स्थानावर : स्पर्धेत, दोन्ही संघांनी आतापर्यंत 7-7 सामने खेळले आहेत, त्यापैकी चेन्नई ने 5 आणि कोलकाताने 2 सामने जिंकले आहेत. धोनीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 धावांत 4 बाद 235 धावा केल्या. अजिंक्य रहाणेने आतिशी फलंदाजी करताना 29 चेंडूत 71 धावांची नाबाद खेळी खेळली. याशिवाय शिवम दुबेने 21 चेंडूत 50 धावा, डेव्हन कॉनवेने 40 चेंडूत 56 धावा केल्या.

जेसन रॉयच्या २६ चेंडूत ६१ धावा : लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरला 20 षटकांत 8 विकेट गमावत 186 धावा करता आल्या. केकेआरतर्फे जेसन रॉयने २६ चेंडूत सर्वाधिक ६१ धावा केल्या. याशिवाय रिंकू सिंगने 33 चेंडूत 53 धावा केल्यानंतर नाबाद राहिली. वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा यांनी CSK विरुद्ध 1-1 विकेट घेतली. कुलवंत खेजरोलियाने २ बळी घेतले. त्याचवेळी तुषार देशपांडे आणि महिष थेक्षानाने 2-2 बळी घेतले. आकाश सिंग, मोईन अली, रवींद्र जडेजा, मथिसा पाथिराना यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

धावांचा डोंगर : केकेआरसमोर सीएसकेने 236 धावांचे भलेमोठे टार्गेट ठेवले. सीएसकेच्या डेविन कॉन्वे याने चांगली खेळी करत 40 बॉलमध्ये 56 धावा केल्या. इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचे मोठे आव्हान संघा समोर होते.

महेंद्र सिंह धोनीची सेना सुसाट - कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपर किंग्सचा संघ पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. तर नितीश राणाच्या नेतृत्त्वात कोलकाता नाईट रायडर्स संघ आठव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आकडेवारीनुसार चेन्नई सुपर किंग्ज संघ मजबूत होता.

मागील सामन्यांची आकडेवारी - चेन्नई सुपर किंग्सने मागील सामना घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध जिंकला होता. चेन्नई संघाने शेवटच्या सामन्यात एडन मार्करमच्या नेतृत्वाखालील हैदराबद संघाचा पराभव केला होता. तर कोलकाता संघाला मागील सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला होता.

सीएसकेचे पारडे जड - चेन्नई सुपर किंग्ज संघाने 27 पैकी 17 सामने जिंकले आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाला फक्त 9 सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे आकडेवारीवरून चेन्नई सुपर किंग्जचे पारडे जड होते.

कोलकाता नाईट रायडर्स संघ : जेसन रॉय, एन जगदीशन, नितीश राणा (कर्णधार), डेव्हिड वेस, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनीर नरेन, के खेजरोलिया, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती, उमेश यादव.

चेन्नई सुपर किंग्जचा संघ : डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शिवम दुबे, मोईन अली, मथिसा पाथीराना, तुषार देशपांडे, महिष थेक्षाना.

हेही वाचा - IPL 2023 : रोमांचक सामन्यात आरसीबीचा विजय; राजस्थानचा 7 धावांनी पराभव

Last Updated : Apr 24, 2023, 12:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.