लखनौ : आयपीएलचा 21वा सामना पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झाला. या सामन्यात पंजाब किंग्जने लखनौ सुपर जायंट्सवर 2 गडी राखून विजय मिळवला. पंजाब किंग्जने या लीगमधील तिसरा विजय मिळवला आहे. यासह पंजाब फ्रँचायझी पॉइंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. पंजाबच्या विजयाचा हिरो ठरलेल्या सिकंदर रझाने 41 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 57 धावा केल्या. मॅथ्यू शॉर्टने 34, हरप्रीत सिंगने 22 धावा केल्या आहेत. शाहरुख खान २३ धावा करून नाबाद राहिला. लखनौने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 159 धावा केल्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जने 19.3 षटकांत 8 विकेट गमावून 161 धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने 56 चेंडूत 74 धावांची खेळी केली. काइल मेयर्सने 29, कृणाल पांड्याने 18, मार्कस स्टॉइनिसने 15 धावा केल्या. पंजाबकडून गोलंदाजी करताना सॅम कुरनने 4 षटकांत तीन बळी घेतले. कागिसो रबाडाने 2, सिकंदर रझाने 1 बळी, हरप्रीत ब्रारने 1 बळी, अर्शदीप सिंगने 1 बळी घेतला.
-
The pressure is on! 😤
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Which 🦁 will produce the @EbixCash Moment Of The Match?#JazbaHaiPunjabi #SaddaPunjab #LSGvPBKS #TATAIPL pic.twitter.com/NpP3uT3RE6
">The pressure is on! 😤
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 15, 2023
Which 🦁 will produce the @EbixCash Moment Of The Match?#JazbaHaiPunjabi #SaddaPunjab #LSGvPBKS #TATAIPL pic.twitter.com/NpP3uT3RE6The pressure is on! 😤
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 15, 2023
Which 🦁 will produce the @EbixCash Moment Of The Match?#JazbaHaiPunjabi #SaddaPunjab #LSGvPBKS #TATAIPL pic.twitter.com/NpP3uT3RE6
आयपीएल 2023 मध्ये आजचा दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होतो आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लखनौने 20 षटकांत 159 धावा केल्या आहेत. लखनौकडून कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक 74 धावांचे योगदान दिले.
-
Delhi Capitals ✅, Sunrisers Hyderabad ✅, Punjab Kings ⏳#LSGBrigade, aapke #SuperGiants apne #GazabAndaz se ho rahe hai #LSGvPBKS ke liye taiyyar 💪#LucknowSuperGiants | #LSG | #GroundSeReport | #LSGUnfiltered | #LSGTV pic.twitter.com/oQ1e3KRRv8
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Delhi Capitals ✅, Sunrisers Hyderabad ✅, Punjab Kings ⏳#LSGBrigade, aapke #SuperGiants apne #GazabAndaz se ho rahe hai #LSGvPBKS ke liye taiyyar 💪#LucknowSuperGiants | #LSG | #GroundSeReport | #LSGUnfiltered | #LSGTV pic.twitter.com/oQ1e3KRRv8
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 15, 2023Delhi Capitals ✅, Sunrisers Hyderabad ✅, Punjab Kings ⏳#LSGBrigade, aapke #SuperGiants apne #GazabAndaz se ho rahe hai #LSGvPBKS ke liye taiyyar 💪#LucknowSuperGiants | #LSG | #GroundSeReport | #LSGUnfiltered | #LSGTV pic.twitter.com/oQ1e3KRRv8
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 15, 2023
दोन्ही संघाची प्लेइंग 11 : लखनौ सुपर जायंट्स - केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बदोनी, आवेश खान, युधवीर सिंग चरक, मार्क वुड, रवी बिश्नोई ; पंजाब किंग्ज - अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया, सिकंदर रझा, सॅम कुरान (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.
लखनौ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी : लखनौ सुपर जायंट्सला घरच्या मैदानावर पराभूत करणे अत्यंत अवघड आहे. या आधी घरच्या एकना स्टेडियमवर खेळले गेलेले दोन्ही सामने लखनौ सुपर जायंट्सने जिंकले आहेत. लखनौने या मोसमात खेळल्या गेलेल्या चारपैकी तीन सामने जिंकले असून सध्या ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी काबिज आहेत. त्यांचा एकमेव पराभव चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झाला आहे.
पंजाबला मधल्या फळीची चिंता : दुसरीकडे या मोसमात सलग दोन सामने जिंकल्यानंतर पंजाब किंग्जच्या संघाने दोन सामन्यांत पराभवाची चव चाखली आहे. कोलकाता आणि राजस्थानविरुद्ध सलग दोन सामने जिंकणाऱ्या शिखर धवनच्या संघाची मधली फळी ढासळत चालली आहे. त्यामुळे त्यांना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. 2022 मध्ये दोन्ही संघांमध्ये केवळ एक सामना खेळला गेला होता, ज्यामध्ये लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जचा 20 धावांनी पराभव केला होता. पुण्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनौने दिलेल्या 154 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग पंजाबला करता आला नाही.
हेही वाचा : Jasprit Bumrah Health Update : जसप्रीत बुमराहचे एकदिवसीय विश्वचषकापूर्वी पुनरागमन, बीसीसीआयने दिले अपडेट