ETV Bharat / sports

IPL 2023 : गुजरात टायटन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा 56 धावांनी पराभव केला, मोहित शर्माने घेतल्या 4 विकेट

दिवसाच्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा 56 धावांनी पराभव केला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 227-2 धावा केल्या होत्या. प्रत्युतरात लखनऊचा संघ 20 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 171 धावाच करू शकला.

Gujarat Titans vs Lucknow Super Giants
गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स
author img

By

Published : May 7, 2023, 3:30 PM IST

Updated : May 7, 2023, 7:38 PM IST

अहमदाबाद : आयपीएल 2023 मध्ये आज गुजरात टायटन्सचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा 56 धावांनी पराभव केला आहे.

मोहित शर्माच्या 4 विकेट : गुजरातने दिलेले 228 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊचा संघ 20 षटकांत केवळ 171-7 धावांच करू शकला. लखनऊकडून डी कॉकने 41 चेंडूत सर्वाधिक 70 धावांचे योगदान दिले. त्याला मेयर्सने 48 धावा काढत उत्तम साथ दिली. मात्र इतर फलंदाज अपयशी ठरले. गुजरातकडून वेगवान गोलंदाज मोहित शर्माने 4 षटकांत 29 धावा देत 4 विकेट घेतल्या.

शुभमन गिलच्या 94 धावा : लखनऊचा कर्णधार क्रुनाल पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात 227 धावा केल्या. गुजरातकडून सलामीवीर शुभमन गिल आणि ऋद्धिमान साहाने तडाखेबाज फलंदाजी केली. गिलने 51 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 94 धावा केल्या. तर साहाने 43 चेंडूत 81 धावा केल्या. त्याने 10 चौकार आणि 4 षटकार ठोकले. लखनऊकडून मोहसिन खान आणि आवेश खानने प्रत्येक 1-1 बळी घेतला.

लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग 11) : क्विंटन डी कॉक, काइल मेयर्स, दीपक हुडा, कृणाल पंड्या (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), स्वप्नील सिंग, यश ठाकूर, रवी बिश्नोई, मोहसीन खान, आवेश खान ; इम्पॅक्ट प्लेअर्स - आयुष बदोनी, अमित मिश्रा, डॅनियल सॅम्स, युधवीर सिंग, प्रेरक मंकड.

गुजरात टायटन्स (प्लेइंग 11) : ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी ; इम्पॅक्ट प्लेअर्स - अल्झारी जोसेफ, दासुन शनाका, केएस भरत, शिवम मावी, जयंत यादव.

क्रुनाल पंड्या : आम्ही प्रथम गोलंदाजी करू. मी माझ्या संघाचे नेतृत्व करतो आहे हे माझ्यासाठी स्वप्न सत्यात उतरल्यासारखं आहे. एकंदरीत विकेट सारखीच खेळेल. आमची फलंदाजी चांगली आहे आणि आम्हाला धावसंख्येचा पाठलाग करण्याची संधी आहे. आम्ही चांगले क्रिकेट खेळलो आणि गुणतालिकेत आम्ही चांगल्या स्थानी उभे आहोत. डी कॉक संघात आला असून, नवीन बाहेर गेला आहे.

हार्दिक पंड्या : आम्ही फलंदाजीच केली असती. आम्हाला जे हवे होते ते मिळाले. आज एक भावनिक दिवस आहे. आमच्या वडिलांना अभिमान वाटला असेल. हे पहिल्यांदाच घडत आहे, त्यामुळे आमच्या कुटुंबाला अभिमान आहे. एक पंड्या आज नक्कीच जिंकेल. आम्ही परिणामाबद्दल काळजी करत नाही. अपयशाची भीती मनात राहू शकते, परंतु आम्हाला चांगले क्रिकेट खेळण्याची गरज आहे. संघात एक अपरिहार्य बदल आहे. लिटल टीम बाहेर गेला आहे कारण त्याला आयर्लंडकडून खेळायचे आहे. त्याच्याजागी अल्झारी संघात आला आहे.

हेही वाचा :

  1. IPL 2023 : दिल्लीचा बंगळुरूवर 7 गडी राखून विजय, फिलिप सॉल्टच्या धमाकेदार 87 धावा
  2. IPL 2023 : जखमी केएल राहुलच्या जागी करुण नायरचा लखनौ सुपरजायंट्स संघात समावेश
  3. IPL 2023 : चेन्नईचा मुंबईवर 6 गडी राखून विजय

Last Updated : May 7, 2023, 7:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.