ETV Bharat / sports

Sai Sudarshan Vijay Shankar Interview : गुजरातसाठी साई सुदर्शन ठरला टर्निंग पॉइंट, 'असा' उडवला दिल्ली कॅपिटल्सचा धुव्वा; पाहा व्हिडिओ - दिल्ली कॅपिटल्स

गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात साई सुदर्शन टर्निंग पॉइंट ठरला आहे. हातातून निसटलेल्या सामन्याचे रुपांतर साई सुदर्शनने विजयात केले. साई सुर्दशन आणि विजय शंकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यांनी सामना कसा जिंकला हे सांगितले आहे.

Sai Sudarshan Vijay Shankar Interview
गुजरातसाठी साई सुदर्शन ठरला टर्निंग पॉइंट
author img

By

Published : Apr 6, 2023, 9:26 AM IST

नवी दिल्ली : गुजरात टायटन्सने आयपीएलच्या 7 व्या सामन्यात 6 गडी राखून दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत विजय मिळवला आहे. या सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना गुजरातला 163 धावांचे लक्ष्य दिले होते. साई सूर्दशन आणि डेव्हिड मिलर यांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर गुजराजने 18.1 षटकांत 11 चेंडूत 4 गडी गमावून आपले लक्ष्य अगदी सहज गाठले. याशिवाय विजय शंकरनेही गुजरातला मजबूत धावसंख्या गाठण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. सई आणि विजयचा एक व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आहे. यामध्ये दोन्ही खेळाडू मॅच विनिंग पॉइंटबद्दल बोलताना दिसत आहेत.

गुजरातने हरलेला सामना कसा जिंकला ? : इंडियन प्रीमियर लीगने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये गुजराजसाठी मॅचविनिंग इनिंग खेळणारे साई सुदर्शन आणि विजय शंकर एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. हे दोन्ही खेळाडू सांगत आहेत की, हार्दिक पंड्याच्या गुजरातने हरलेला सामना कसा जिंकला. गुजरात टायटन्सचे फलंदाज जेव्हा लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरले तेव्हा दिल्लीचे गोलंदाज त्यांच्यावर वर्चस्व गाजवताना दिसले. या सामन्यात स्टार फलंदाज शुभमन गिल आणि कर्णधार हार्दिक पंड्यालाही काही आश्चर्यकारक करता आले नाही. शुभमनने 13 चेंडूत 14 तर हार्दिकने 4 चेंडूत 5 धावा केल्या. त्यामुळे गुजरातला विजयाची अपेक्षा नव्हती.

उत्कृष्ट फलंदाजीमुळे दिल्लीचे गोलंदाज गारद : साई-विजय-मिलर गुजरातसाठी टर्निंग पॉइंट ठरले. साई सुदर्शनने सुरुवातीला क्रीझवर आरामात फलंदाजी केली, पण जेव्हा सामना हातातून निसटू लागला तेव्हा त्याने आक्रमक फलंदाजी सुरू केली. यानंतर साईने दिल्लीच्या गोलंदाजांची चांगलीच दमछाक केली. तसेच त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे दिल्लीचे गोलंदाज गारद झाले. साई सुदर्शन आणि विजय शंकर यांनी अर्धशतकी भागीदारी खेळली तेव्हा सामन्याला कलाटणी मिळाली. साईने 48 चेंडूंत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 62 धावा केल्यानंतरही तो नाबाद राहिला. त्याचवेळी 14व्या षटकात विजय शंकर 23 चेंडूत तीन चौकारांसह 29 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर डेव्हिड मिलरने प्रवेश केला. मिलरने वेगवान फलंदाजी करताना 16 चेंडूत 31 धावा केल्या.

हेही वाचा : IPL 2023 : रोमांचक मॅच नंतर पंजाब किंग्जचा राजस्थान रॉयल्सवर ५ धावांनी विजय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.