ETV Bharat / sports

IPL 2023 : राजस्थानचा दिल्लीवर मोठा विजय, बोल्ट-चहलची घातक गोलंदाजी - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

आयपीएलचा 11 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने दिल्लीवर 57 धावांनी मोठा विजय मिळवला आहे.

Delhi Capitals vs Rajasthan Royals
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
author img

By

Published : Apr 8, 2023, 3:12 PM IST

Updated : Apr 8, 2023, 7:36 PM IST

गुवाहाटी : आयपीएलच्या 11 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सचा 57 धावांनी पराभव केला आहे. राजस्थानने दिलेल्या 200 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव गडगडला. 20 षटकांत दिल्लीच्या संघाने 9 विकेट गमावून 142 धावा केल्या. दिल्लीकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने एकाकी झुंज दिली. त्याने 55 चेंडूत 65 धावा केल्या. दिल्लीचे इतर फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले. राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहलने घातक गोलंदाजी करत प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

दिल्लीचा डाव गडगडला : सलामीवीर पृथ्वी शॉ या सामन्यातही अपयशी ठरला आहे. त्याला शून्याच्या स्कोरवर ट्रेंट बोल्टने आउट केले. संघात पुनरागमन करणारा अनुभवी फलंदाज मनिष पांडेही काही कमाल दाखवू शकला नाही. त्याला पहिल्याच चेंडूवर बोल्टने एलबीडब्लू आउट केले. दिल्लीकडून ललित यादवने थोडाफार संघर्ष केला. त्याने 24 चेंडूत 38 धावा केल्या. त्यालाही बोल्टनेच आउट केले.

राजस्थानची दमदार बॅटिंग : प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने दमदार सुरुवात केली. राजस्थानच्या 20 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 199 धावा झाल्या आहेत. सलामीवीर जोस बटलरने सर्वाधिक 79 धावा केल्या. त्याला जयस्वाल आणि हेटमायरने उत्तम साथ दिली. दिल्लीकडून मुकेश कुमारने 2 तर कुलदीप यादव व रोवमन पॉवेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

हेटमायरची तडाखेबंद फलंदाजी : या आधी सलामीवीर यशस्वी जयस्वालने 31 चेंडूत शानदार 60 धावांची खेळी केली. त्याला मुकेश कुमारने बाद केले. त्यानंतर फलंदाजीला आलेला कर्णधार संजू सॅमसन मात्र सपशेल अपयशी ठरला. त्याला कुलदीप यादवने शून्यावर नॉर्कियाच्या हातून झेलबाद केले. अंतिम षटकात शिमरॉन हेटमायरने तडाखेबंद फलंदाजी केली. त्याने 21 चेंडूत 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 39 धावा ठोकल्या.

दोन्ही संघाची प्लेइंग 11 : राजस्थान रॉयल्स - जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार, यष्टीरक्षक), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, जेसन होल्डर, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा ; दिल्ली कॅपिटल्स - डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनिष पांडे, ललित यादव, रेली रॉसौ, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, एनरिच नॉर्किया, मुकेश कुमार, खलिल अहमद

हे ही वाचा : IPL 2023 : उद्या मुंबईचा सामना रंगणार सीएसकेशी, रोहित घरच्या मैदानावर करणार जिंकण्याचा प्रयत्न

Last Updated : Apr 8, 2023, 7:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.