चेन्नई : येथील चेपॉक मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या संघादरम्यान खेळवण्यात आलेल्या सामन्यात चेन्नई एक्सप्रेस सुसाट सुटली आहे. चेन्नई संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात गुजरात संघाचा 15 धावांनी धुव्वा उडवून तब्बल 10 व्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई संघाने 172 धावा केल्या. मात्र प्रत्युत्तरात गुजरातचा संघ 157 धावांवर गुंडाळण्यात चेन्नई संघाला यश आले. दुसरीकडे सामना हरला, तरी गुजरातला अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.
-
The Chennai Super Kings Captain - MS Dhoni answers 𝗧𝗛𝗔𝗧 question again 😉#TATAIPL | #Qualifier1 | #GTvCSK | @msdhoni | @ChennaiIPL pic.twitter.com/drlIpcg5Q5
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The Chennai Super Kings Captain - MS Dhoni answers 𝗧𝗛𝗔𝗧 question again 😉#TATAIPL | #Qualifier1 | #GTvCSK | @msdhoni | @ChennaiIPL pic.twitter.com/drlIpcg5Q5
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2023The Chennai Super Kings Captain - MS Dhoni answers 𝗧𝗛𝗔𝗧 question again 😉#TATAIPL | #Qualifier1 | #GTvCSK | @msdhoni | @ChennaiIPL pic.twitter.com/drlIpcg5Q5
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2023
चेन्नई संघाला अंतिम फेरीत खेळण्याचे तिकीट : चेन्नई सुपर किग्ज संघाने गुजरात टायटन्सचा पराभव करत या मोसमातील अंतिम फेरीत खेळण्याचे तिकीट मिळवले आहे. चेन्नई संघाने प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकीय खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारायला मदत केली. ऋतुराज गायकवाडने 60 धावांची खेळी केली. त्याला डेव्हॉन कॉनवेने 40 धावांचे योगदान देत चांगली मदत केली. या दोन्ही समामीविरांनी पहिल्या विकेटसाठी 87 धावांचा पाया रचला. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने 16 चेंडूत 22 धावा करुन विस्फोटक खेळी केली. चेन्नई संघाचे आघाडीचे फलंदाज अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायडूला आज सारख्याच 17 धावा करता आल्या. दुसरीकडे मात्र कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह शिवम दुबेने भोपळा फोडून प्रत्येीक एक धाव केली. मोईन अली 4 चेंडूत 9 धावा करुन नाबाद तंबुत परतला. गुजरात संघाकडून मोहम्मद शमी आणि मोहित शर्माने प्रत्येकी दोन गड्यांना तंबुचा रस्ता दाखवला. तर दर्शन नळकांडे, नूर अहमद आणि राशिद खानला चेन्नईचा एकेक मोहरा टिपण्यात यश आले. चेन्नईच्या संघाने 172 धावा करत गुजरात संघाला 173 धावांचे लक्ष्य दिले.
-
Consistent run with the bat 👌🏻
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Powerplay wickets 😎
Mini-Battle for the best catch 😃
Final Calling: On the mic with @deepak_chahar9 & @Ruutu1331 post #CSK's win in #Qualifier1 👌🏻👌🏻 - By @28anand
Full Interview 🎥🔽 #TATAIPL | #GTvCSKhttps://t.co/P2QzyUwuvr pic.twitter.com/zePCIekzRO
">Consistent run with the bat 👌🏻
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2023
Powerplay wickets 😎
Mini-Battle for the best catch 😃
Final Calling: On the mic with @deepak_chahar9 & @Ruutu1331 post #CSK's win in #Qualifier1 👌🏻👌🏻 - By @28anand
Full Interview 🎥🔽 #TATAIPL | #GTvCSKhttps://t.co/P2QzyUwuvr pic.twitter.com/zePCIekzROConsistent run with the bat 👌🏻
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2023
Powerplay wickets 😎
Mini-Battle for the best catch 😃
Final Calling: On the mic with @deepak_chahar9 & @Ruutu1331 post #CSK's win in #Qualifier1 👌🏻👌🏻 - By @28anand
Full Interview 🎥🔽 #TATAIPL | #GTvCSKhttps://t.co/P2QzyUwuvr pic.twitter.com/zePCIekzRO
शुभमन गिलची एकाकी झुंज : चेन्नई सुपर किंग्जने दिलेल्या 173 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या गुजरात संघाला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. गुजरातकडून शुभमन गिलने एकाकी झुंज देत सर्वाधिक 42 धावा केल्या. शुभमनने सलग दोन शतकांची धुव्वाधार फलंदाजी केल्यानंतर तो आज इतिहास रचन्याच्या इराद्याने मैदानात आला होता. मात्र गुजरातचा एकापाठोपाठ एक फलंदाज नांगी टाकत असल्याने शुभमन गिलने एकाकी किल्ला लढवत झुंज दिली. शुभमनने 38 चेंडूत 42 धावा केल्या. या खेळीत त्याने 4 चौकारांसह 1 उत्तुंग षटकार लगावला. मात्र गुजरातच्या इतर फलंदाजांनी निराशा केली. राशीद खानने 16 चेंडूत 30 धावांची खेळी केली, मात्र त्यानंतर गुजरात संघाच्या फलंदाजांनी चेन्नईच्या गोलंदाजापुढे नांगी टाकली. चेन्नईच्या दीपक चहर, महिश तिक्ष्णा, रविंद्र जडेजा आणि महिषा पथिराना यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना घरचा रस्ता दाखवला. तुषार देशपांडेला एका बळीवर समाधान मानावे लागले.
-
In #Qualifier1 of #TATAIPL between #GT & #CSK
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Here are the RuPay On-The-Go 4s, TIAGO.ev Electric Striker & Dream11 GameChanger of the match award winners. #GTvCSK@RuPay_npci | #RuPayCreditonUPI | #BeOnTheGo@Tatamotorsev | #Tiagoev | #Goev@Dream11 | #SabKhelenge pic.twitter.com/3tCQ1rqeKw
">In #Qualifier1 of #TATAIPL between #GT & #CSK
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2023
Here are the RuPay On-The-Go 4s, TIAGO.ev Electric Striker & Dream11 GameChanger of the match award winners. #GTvCSK@RuPay_npci | #RuPayCreditonUPI | #BeOnTheGo@Tatamotorsev | #Tiagoev | #Goev@Dream11 | #SabKhelenge pic.twitter.com/3tCQ1rqeKwIn #Qualifier1 of #TATAIPL between #GT & #CSK

हेही वाचा -