पुणे : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आपला 200 वा सामना संस्मरणीय बनवू शकला नाही. आयपीएल 2022 च्या 49 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने (Royal Challengers Bangalore) चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) 13 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना RCB ने 173 धावा केल्या होत्या, मात्र चेन्नई संघाला 20 षटकात 8 विकेट गमावून 160 धावाच करता आल्या. CSK चा 10 सामन्यांमधला हा 7वा पराभव आहे. त्याचवेळी, आरसीबीचा 11 सामन्यांमध्ये सहावा विजय आहे. संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. सलग 3 पराभवानंतर संघाला पहिला विजय मिळाला.
चेन्नई सुपर किंग्जची पहिली विकेट ऋतुराज गायकवाडच्या (28) रूपाने पडली. रॉबिन उथप्पा फक्त एक धाव काढू शकला. अंबाती रायुडू (10) ही लवकर पॅव्हेलियनमध्ये परतला. डेव्हॉन कॉनवेने (56) दमदार फलंदाजी करत सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. रवींद्र जडेजा 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मोईन अलीने 34 आणि धोनीने 2 धावा केल्या.
-
Maheesh Theekshana is our Top Performer from the first innings for his bowling figures of 3/27.
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A look at his bowling summary here 👇👇 #TATAIPL #RCBvCSK pic.twitter.com/QtnOgc4bjq
">Maheesh Theekshana is our Top Performer from the first innings for his bowling figures of 3/27.
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2022
A look at his bowling summary here 👇👇 #TATAIPL #RCBvCSK pic.twitter.com/QtnOgc4bjqMaheesh Theekshana is our Top Performer from the first innings for his bowling figures of 3/27.
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2022
A look at his bowling summary here 👇👇 #TATAIPL #RCBvCSK pic.twitter.com/QtnOgc4bjq
तत्पूर्वी, महिपाल लामौर (42) आणि कर्णधार फाफ डूप्लेसि (38) यांच्या शानदार फलंदाजीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ला 174 धावांचे लक्ष्य दिले. बंगळुरूने 20 षटकांत आठ गडी गमावून 173 धावा केल्या. चेन्नईकडून महेश थिकशनाने तीन विकेट्स घेतल्या. मोईन अलीने दोन तर ड्वेन प्रिटोरियसने एक विकेट घेतली.
नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या बंगळुरूने पॉवरप्लेमध्ये चांगली सुरुवात केली आणि एकही विकेट न गमावता 57 धावा केल्या. पण यानंतर कर्णधार फाफ डूप्लेसिस (38) आणि ग्लेन मॅक्सवेल (3) यांच्या रूपाने बंगळुरूला दोन धक्के बसले. ज्यामुळे बंगळुरूची धावसंख्या 9 षटकांनंतर 2 बाद 76 अशी कमी झाली. मात्र, सलामीवीर विराट कोहलीने दुसऱ्या टोकाला शानदार फलंदाजी करत अनेक चौकार लगावले.
पण कोहलीने 33 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 30 धावा केल्या आणि अलीच्या गोलंदाजीवर बेंगळुरूने 79 धावांवर तीन गडी गमावले. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आलेल्या महिपाल लमलोर आणि रजत पाटीदार यांनी गडबडलेल्या डावाला सांभाळण्याचे काम केले. दोघांनी विजयाची धावसंख्या 100 च्या पुढे नेली. पण 16व्या षटकात पाटीदार (21) प्रिटोरियसच्या चेंडूवर मुकेशकरवी झेलबाद झाला, त्यामुळे बेंगळुरूला 124 धावांवर चौथा धक्का बसला.
दिनेश कार्तिकने सहाव्या क्रमांकावर असलेल्या लामोरसह शानदार फलंदाजी केल्याने बंगळुरूने 18 षटकांत चार गडी गमावून 155 धावा केल्या. पण 19व्या षटकात थिकशनाने लॅमोर (3 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 27 चेंडूत 42 धावा), वानिंदू हसरंगा (0) आणि शाहबाज अहमद (1) यांना बाद करून केवळ दोन धावा गमावल्या. 20 व्या षटकात, कार्तिकने प्रिटोरियसच्या चेंडूवर दोन षटकारांसह एकूण 16 धावा केल्या. परंतु हर्षल पटेल खाते न उघडता धावबाद झाला. त्यामुळे बंगळुरूने 20 षटकात 8 विकेट गमावून 173 धावा केल्या. कार्तिक १७ चेंडूंत एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २६ धावा करून नाबाद राहिला.
हेही वाचा : Bareily News : बरेलीतील अॅथलेट आहार आणि किट मिळवण्यासाठी मजुरीने जातायेत गहू काढणीला