मुंबई - १८ फेब्रुवारीला होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या लिलावासाठी खेळाडूंची अंतिम यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. चेन्नई येथे होणार्या आयपीएल लिलावात एकूण २९२ खेळाडूंवर बोली लागणार आहे. यामध्ये १६४ भारतीय, १२५ परदेशी आणि सहयोगी देशांतील ३ खेळाडूंचा समावेश असेल.
यावेळी आयपीएलच्या ८ संघांनी १३९ खेळाडू कायम राखले आहेत, तर ५७ खेळाडूंना त्यांच्या संघातून मुक्त करण्यात आले आहे. एकूण १९६.६ कोटींची ही लिलावप्रक्रिया पार पडणार आहे. गेल्या आठवड्यात १११४ क्रिकेटपटूंनी लिलावासाठी नोंदणी केली होती. आठही फ्रेंचायझींनी निवड केलेल्या खेळाडूंची यादी सादर केल्यानंतर अंतिम यादी जाहीर केली गेली.
-
ALERT🚨: VIVO IPL 2021 Player Auction list announced
— IndianPremierLeague (@IPL) February 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
2⃣9⃣2⃣ players set to go under the hammer in Chennai on February 18, 2021 😎
More details 👉 https://t.co/m8oEWWw4tg pic.twitter.com/881TWQifah
">ALERT🚨: VIVO IPL 2021 Player Auction list announced
— IndianPremierLeague (@IPL) February 11, 2021
2⃣9⃣2⃣ players set to go under the hammer in Chennai on February 18, 2021 😎
More details 👉 https://t.co/m8oEWWw4tg pic.twitter.com/881TWQifahALERT🚨: VIVO IPL 2021 Player Auction list announced
— IndianPremierLeague (@IPL) February 11, 2021
2⃣9⃣2⃣ players set to go under the hammer in Chennai on February 18, 2021 😎
More details 👉 https://t.co/m8oEWWw4tg pic.twitter.com/881TWQifah
श्रीशांतच्या पदरी मात्र निराशा
यंदा आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीशांतच्या पदरी मात्र निराशा आली आहे. आयपीएलच्या शॉर्टलिस्ट खेळाडूंमध्ये त्यांच्या नावाचा समावेश झालेला नाही.
हेही वाचा - अँडरसनने सर्वाधिक वेळा भारतीय फलंदाजांना केलं शून्यावर बाद, पाहा रेकॉर्ड
२ कोटींच्या गटात कोण
हरभजन सिंग, केदार जाधव आणि ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, शाकिब अल हसन, मोईन अली, सॅम बिलिंग्ज, लियाम प्लंकेट, जेसन रॉय आणि मार्क वुड या आठ परदेशी खेळाडूंची सर्वाधिक २ कोटींच्या गटात निवड झाली आहे. तर, १.५ कोटीच्या बेस प्राइसमध्ये एकूण १२ विदेशी खेळाडू आहेत. याखेरीज १ कोटीच्या बेस प्राइसमध्ये ११ खेळाडू असून त्यामध्ये २ भारतीयांचा समावेश आहे.
१५ विदेशी खेळाडू ७५ लाखांच्या बेस प्राइस प्रकारात आहेत. तर ५० लाख रुपयांच्या वर्गात ६५ खेळाडू असून त्यामध्ये १३ भारतीय खेळाडू आणि ५२ विदेशी खेळाडू आहेत. १८ फेब्रुवारी रोजी हा लिलाव दुपारी ३ पासून सुरू होईल.