ETV Bharat / sports

IPL 2023 : रिंकू सिंग पुन्हा एकदा बनला हिरो, केला 'हा' नवा विक्रम - कोलकाता नाईट रायडर्स

अलिगडच्या रिंकू सिंगने आयपीएलमध्ये वर्चस्व गाजवले आहे. अलिगडचे क्रीडाप्रेमी त्याच्या खेळावर खूप खूश आहेत. तो असेल तर विजय शक्य आहे, हे त्यांच्या लक्षात आले आहे.

rinku singh
रिंकू सिंग
author img

By

Published : May 9, 2023, 11:23 AM IST

अलीगढ : अलिगढच्या रिंकू सिंगला खरेदी करणे कोलकाता नाईट रायडर्ससाठी तोट्याचा सौदा ठरला नाही. कोलकाताने 2018 मध्ये रिंकू सिंगला केवळ 20 लाखांमध्ये खरेदी केले. पण, तो संघासाठी अतिशय फायदेशीर खेळाडू ठरत आहे. सामन्याच्या शेवटच्या 5 चेंडूत 5 षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकणाऱ्या खेळाडूसाठी शेवटच्या चेंडूवर चौकार मारणे ही काही मोठी गोष्ट नाही. पंजाब किंग्जचा पराभव करून कोलकाता नाईट रायडर्सने प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. कोलकाताने आपल्या घरच्या मैदानावर सलग तीन पराभवानंतर विजय मिळवला. त्याचबरोबर आता रिंकू सिंग असेल तर विजय शक्य असल्याचे बोलले जात आहे.

रिंकू सिंग प्रतिभावान खेळाडू : पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असला तरी इडन गार्डन्सवर प्रथम खेळताना पंजाबने 20 षटकांत 7 गडी गमावून 179 धावा केल्या. मात्र, पंजाबनेही खेळावर पकड ठेवली. पण, सॅम करणने 19व्या षटकात 20 धावा केल्या. त्यामुळे अर्शदीपला खेळ वाचवण्यासाठी काहीच उरले नाही. त्याचवेळी कर्णधार नितीश राणा म्हणाला की, रिंकू सिंग प्रतिभावान खेळाडू आहे. रिंकू सिंग मैदानात असताना मैदानातून रिंकू-रिंकू आवाज येतो. तो क्षण खूप खास असतो.

रिंकू सिंग पुन्हा एकदा हिरो बनला : रिंकू सिंगने ज्या पद्धतीने सामना जिंकला, त्यापेक्षा चांगला फिनिशर यंदाच्या आयपीएलमध्ये कोणत्याही संघात दिसला नाही. रिंकू सिंगने शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकला, तो विजयी शॉट होता. रिंकू सिंगने हा पराक्रम पहिल्यांदाच केला नसून, याआधीही अनेकवेळा केला आहे. मात्र, अर्शदीपचे षटक अप्रतिम होते. पण, फलंदाज रिंकू सिंगने शेवटच्या चेंडूवर फटकेबाजी केली. रिंकू सिंग पुन्हा एकदा हिरो बनला. त्याचवेळी कोलकाताच्या खेळाडूंनी विजयानंतर आनंद साजरा केला. रिंकू सिंग नाबाद राहिला आणि त्याने 10 चेंडूत 1 षटकार आणि दोन चौकारांसह 21 धावा केल्या. कोलकाताने 5 विकेट गमावून 182 धावा करत विजय मिळवला.

हेही वाचा : Nana Patole on MLAS disqualification : सत्तासंघर्षाच्या निकालात नेमके काय घडणार? नाना पटोले म्हणाले...
हेही वाचा : Major Road Accident In MP : मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये प्रवासी बस पुलाखाली कोसळल्याने भीषण अपघात, 14 प्रवाशांचा मृत्यू
हेही वाचा : Saamana Article News: गायब मुलींची धक्कादायक माहिती समोर, ठाकरे गटाची शाह-मोदींवर सडकून टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.