मुंबई: इंडियन प्रीमियर लीग ( Indian Premier League ) सायकल 2023-27 साठी मीडिया हक्कांचा लिलाव रविवारी सकाळी 11 वाजता सुरू झाला आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालला. दरम्यान, स्पर्धेतील प्रत्येक सामन्याचे हक्काचे मूल्य 100 कोटींच्या पुढे गेले आहे. आता सोमवारी सकाळी 11 वाजता ई-लिलाव सुरू होणार आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, आयपीएलच्या प्रत्येक सामन्याची किंमत 100 कोटींच्या पुढे गेली आहे.
कोणत्या कंपनीने किती बोली लावली हे अद्याप कळलेले नाही. मात्र, टीव्हीच्या हक्कांसाठी डिस्ने स्टार, सोनी नेटवर्क आणि रिलायन्स यांच्यात स्पर्धा सुरू आहे. त्याच वेळी, झी, हॉटस्टार आणि रिलायन्स जिओ डिजिटल अधिकारांच्या शर्यतीत ( The race for digital rights ) आहेत. एम-जंक्शनने आयपीएल मीडिया ई-लिलावची ( IPL media e-auction ) जबाबदारी घेतली आहे.
-
IPL Media Rights Day-1: Bidding value for TV, digital goes past Rs 43,000 crore
— ANI Digital (@ani_digital) June 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/cG0DKrhfuK#IPLMediaRights #IPL pic.twitter.com/RLwbfRt7rF
">IPL Media Rights Day-1: Bidding value for TV, digital goes past Rs 43,000 crore
— ANI Digital (@ani_digital) June 12, 2022
Read @ANI Story | https://t.co/cG0DKrhfuK#IPLMediaRights #IPL pic.twitter.com/RLwbfRt7rFIPL Media Rights Day-1: Bidding value for TV, digital goes past Rs 43,000 crore
— ANI Digital (@ani_digital) June 12, 2022
Read @ANI Story | https://t.co/cG0DKrhfuK#IPLMediaRights #IPL pic.twitter.com/RLwbfRt7rF
अहवालात पुढे नमूद करण्यात आले आहे की डिजिटल अधिकारांची किंमत टेलिव्हिजन अधिकारांच्या ( IPL television rights ) अगदी जवळ असण्याची शक्यता आहे. टीव्हीसाठी प्रत्येक सामन्याची आधारभूत किंमत 49 कोटी रुपये आणि डिजिटलसाठी 33 कोटी रुपये निश्चित करण्यात आली होती. मात्र आतापर्यंत डिजिटलसाठी 46 कोटी रुपये आणि टीव्हीसाठी 54.5 कोटी रुपयांची बोली लागली आहे.
पॅकेजनुसार प्रति सामन्याची आधारभूत किंमत:
पॅकेज A कडे प्रति सामना 49 कोटी रुपये, 'B' कडे प्रति सामना 33 कोटी रुपये, पॅकेज C चे 18 नॉन-एक्सक्लुझिव्ह स्पेशल सामने आहेत, ज्याची मूळ किंमत आहे 11 कोटी रुपये आणि पॅकेज D चे बाकीचे जागतिक हक्क आहेत 3 कोटी रुपये. अहवालात पुढे म्हटले आहे की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ठरवून दिलेल्या नियमांनुसार रविवारी लिलाव संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालला. आयपीएल मीडिया हक्कांचा लिलाव सोमवारी ( IPL media rights auction on Monday ) देखील सुरू होणार आहे. त्यात म्हटले आहे की, प्रत्येक बोलीदार 30 मिनिटांच्या अंतराचा पुरेपूर वापर करत असून हा लिलाव दोन दिवसांसाठी ठेवण्यात आला आहे.
2017-22 सायकलसाठी स्टार इंडियाकडे सध्याचे आयपीएल हक्क होते. सप्टेंबर 2017 मध्ये, टीव्ही आणि डिजिटल दोन्हीसाठी 16,347.50 कोटी रुपयांच्या बोली लावल्या गेल्या. याआधी सोनी पिक्चर्स नेटवर्क्सने स्पर्धेच्या सुरुवातीच्या काळात 10 वर्षांच्या कालावधीसाठी 8,200 कोटी रुपयांच्या बोलीसह आयपीएल टीव्ही मीडिया हक्क जिंकले होते.
हेही वाचा - Ind Vs Sa 2nd T20 : भारताची फलंदाजी ढेपाळली, दक्षिण आफ्रिकेला 149 धावांचे लक्ष्य