हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग 2022 ( Indian Premier League 2022 ) मध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात 12 मे रोजी वानखेडे स्टेडियमवर सामना खेळला गेला. जेव्हा चेन्नईच्या डावात सलामीवीर रुतुराज गायकवाडची ( Opener Ruturaj Gaikwad ) विकेट पडताच सवयीनुसार आयपीएलचा कॅमेरा प्रेक्षकांच्या दिशेने सरकला. त्यावेळी कॅमेराच्या नजरेतून एक अनोळखी तरुणीचा चेहरा कॅप्चर झाला. जो सेलिब्रेट करण्यात व्यस्त असताना टीव्हीवर सर्वांना दिसला. ज्यानंतर सोशल मीडियावर त्या तरुणीचा फोटो व्हायरल होत आहे आणि सर्व प्रेक्षकांना ती तरुणी कोण आहे, हा प्रश्न पडला आहे.
यानंतर कॅमेरा अनेक वेळा या सुंदर तरुणीकडे वळताना पाहिला गेला. लोकांना जाणून घ्यायचे आहे की ती तरुणी कोण आहे? मात्र, सोशल मीडियावर महिला चाहत्याचा फोटो व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. जवळपास प्रत्येक सामन्यात असा एक प्रेक्षक असतो, जो लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो.
-
Camera Man Name Please pic.twitter.com/js6636BVc4
— Manoj (@iplcric2022) May 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Camera Man Name Please pic.twitter.com/js6636BVc4
— Manoj (@iplcric2022) May 12, 2022Camera Man Name Please pic.twitter.com/js6636BVc4
— Manoj (@iplcric2022) May 12, 2022
सामन्याबद्दल बोलायचे तर, मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्स ( Bowler Daniel Sams ), जसप्रीत बुमराह आणि रिले मेरेडिथ यांनी गुरुवारच्या सामन्यात, खेळपट्टीच्या स्विंग आणि बाऊन्सचा चांगला उपयोग केला आणि चेन्नईला 97 धावांवर सर्वबाद बाद केले.
-
Cameraman never forget his duty 😂#CSKvsMI #CSK #dhoni #umpire Dhoni #Thala #ThalaDhoni pic.twitter.com/ztaEFklExx
— xyz_ (@Tejashwi_rofl) May 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Cameraman never forget his duty 😂#CSKvsMI #CSK #dhoni #umpire Dhoni #Thala #ThalaDhoni pic.twitter.com/ztaEFklExx
— xyz_ (@Tejashwi_rofl) May 12, 2022Cameraman never forget his duty 😂#CSKvsMI #CSK #dhoni #umpire Dhoni #Thala #ThalaDhoni pic.twitter.com/ztaEFklExx
— xyz_ (@Tejashwi_rofl) May 12, 2022
सॅम्सने 16 धावांत तीन बळी घेतले. मेरेडिथने 27 धावांत दोन आणि बुमराहने तीन षटकांत 12 धावांत एक बळी घेतला. त्याचवेळी मुंबई इंडियन्सने सहाव्या षटकात पाच विकेट गमावल्या होत्या. मात्र, मुंबईच्या टिळक वर्माने शानदार खेळी करत संघाला विजयापर्यंत नेले.
हेही वाचा - Shane Watson Statement : दिल्लीच्या उर्वरित सामन्यांमध्ये पृथ्वी शॉ खेळण्याची शक्यता नाही - शेन वॉटसन