ETV Bharat / sports

IPL 2022 Updates : रिटायर्ड हर्ट आणि रिटायर्ड आऊटमध्ये काय आहे फरक? जाणून घ्या एका क्लिकवर - कर्णधार संजू सैमसन

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) मध्ये, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन, संघ व्यवस्थापन आणि रविचंद्रन अश्विन यांनी एकत्र क्रांतिकारक पाऊल उचलले. हे पाऊल आगामी काळात मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गेम चेंजर ठरू शकते. क्रिकेटमधील रिटायर्ड हार्टपेक्षा रिटायर्ड आऊट किती वेगळे आहे ते समजून घेऊया.

RR
RR
author img

By

Published : Apr 11, 2022, 10:55 PM IST

हैदराबाद: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना, आर अश्विनने असे पाऊल उचलले, जे आगामी काळात मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये बदल म्हणून पाहिले जात आहे. कर्णधार संजू सॅमसनच्या म्हणण्यानुसार, त्याने आणि राजस्थानच्या संघाने याचा आधीच विचार केला होता, पण लखनऊविरुद्धच्या सामन्यातील परिस्थिती पाहता संघाने तो लागू करण्याचा विचार केला. राजस्थानचा हा सट्टा चांगलाच यशस्वी ठरला.

सुरुवातीच्या विकेट लवकर पडल्यानंतर, 6 व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अश्विनने एकेकाळी राजस्थानचा डाव सांभाळला. पण स्लॉग ओव्हर्समध्ये आपल्याला मोठे फटके बसत नाहीत असे वाटल्यावर, त्याने स्वत:हून रिटायर्ड आऊट झाला आणि रियान परागला मैदानात उतरण्याची संधी दिली. पॉवर प्ले ओव्हर्समध्ये 3-4 षटकांनंतर सलग चार विकेट्स गमावल्याने राजस्थानचा संघ दडपणाखाली होता. चार गड्यांच्या मोबदल्यात ६७ धावा असताना अश्विनने शिमरॉन हेटमायरच्या साथीने डाव सांभाळला.

रिटायर्ड हर्ट आणि रिटायर्ड आऊटमधला फरक?

रिटायर्ड आऊट आणि रिटायर्ड हर्ट यात खुप मोठा फरक आहे, जेव्हा एखादा खेळाडू दुखापत, क्रॅम्प, हॅमस्ट्रिंग किंवा इतर कोणत्याही कारणामुळे फलंदाजी करू शकत नाही, तेव्हा तो क्रीज सोडून डग आऊटच्या दिशेने गेला तर त्याचा विचार रिटायर्ड हर्ट म्हणून केला जातो. तसेच रिटायर्ड आउट हा खेळाडूचा स्वतःचा निर्णय असतो. जर कोणत्याही फलंदाजाने स्वेच्छेने क्रीज सोडली आणि दुसऱ्या फलंदाजाला संधी दिली, तर तो रिटायर्ड आऊट समजला जातो. हे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गेम चेंजर ठरू शकते.

हे अशा प्रकारे देखील समजले जाऊ शकते, जेव्हा एखादा फलंदाज पंच किंवा विरोधी संघाच्या कर्णधाराशी सल्लामसलत न करता त्याच्या डावाच्या मधूनच पॅव्हेलियनकडे जातो, तेव्हा त्याला रिटायर्ड आऊट मानले जाते. नियमानुसार तो विकेट मानला जातो. एकदा फलंदाज रिटायर्ड आउट झाल्यावर तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकत नाही. दुसरीकडे, रिटायर्ड हर्ट फलंदाज संघाच्या आवश्यकतेनुसार पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरू शकतो.

रिटायर्ड आउट होण्याबाबत आयसीसीचा कायदा काय सांगतो?

  • नियम 25.4.1 नुसार, एक फलंदाज त्याच्या डावात कधीही चेंडू संपल्यावर रिटायर्ड होऊ शकतो. खेळ सुरू ठेवण्यापूर्वी पंचांना फलंदाजाच्या रिटायर्ड कारण कळवले जाईल.
  • नियम 25.4.2 नुसार, जर एखादा फलंदाज आजारपणामुळे, दुखापतीमुळे किंवा इतर कोणत्याही अपरिहार्य कारणामुळे निवृत्त झाला, तर त्या फलंदाजाला त्याचा डाव पुन्हा सुरू करण्याचा अधिकार आहे. जर काही कारणास्तव असे घडले नाही, तर त्या फलंदाजाची नोंद 'रिटायर्ड- नॉट आऊट' म्हणून केली जाते.
  • नियम 25.4.3 नुसार, जर एखादा फलंदाज 25.4.2 व्यतिरिक्त कोणत्याही कारणास्तव रिटायर्ड झाला, तर त्या फलंदाजाचा डाव केवळ विरोधी कर्णधाराच्या संमतीनेच सुरू केला जाऊ शकतो. काही कारणास्तव त्याचा डाव पुन्हा सुरू झाला नाही, तर त्या फलंदाजाची नोंद 'रिटायर्ड-आऊट' म्हणून केली जाते.
  • नियम 25.4.4 नुसार, 25.4.2 आणि 25.4.3 च्या आवश्यकतेनुसार, रिटायर्डनंतर जर फलंदाजाने आपला डाव पुन्हा सुरू केला, तर तो फक्त विकेट पडल्यावर किंवा दुसऱ्या फलंदाजाच्या रिटायर्ड होण्यावर असेल.

यापूर्वी टी-20 स्पर्धेत अशा घडलेल्या घटना -

  • अॅडलेड स्ट्रायकर्स विरुद्ध BBL 2022 च्या सामन्यादरम्यान सिडनी सिक्सर्सने देखील ही रणनीती वापरली होती. जखमी जॉर्डन सिल्क पॅव्हेलियनमध्ये परतला आणि जे लेंटन मध्यभागी आला. सिक्सर संघाने अखेरीस चार विकेट्स राखून लक्ष्याचा पाठलाग केला आणि अंतिम फेरीत धडक मारली.
  • भूतानची सोनम तोबगे 2019 मध्ये मालदीव विरुद्धच्या T20I दरम्यान अशाच प्रकारे पॅव्हेलियनमध्ये परतली होती. तिने 35 चेंडूत 24 धावा केल्या.
  • बांगलादेश प्रीमियर लीग 2019 मध्ये चट्टोग्राम चॅलेंजर्सविरुद्ध खेळताना कॅमिला वॉरियर्सच्या सुंजामुल इस्लामने हा पराक्रम केला आहे.
  • पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीने 2010 मध्ये पाकिस्तानकडून नॉर्थंट्सविरुद्ध खेळताना एका टूर मॅचमध्ये 14 चेंडूत 42 धावा केल्या होत्या.

हेही वाचा - Ipl 2022 Srh Vs Gt : नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाजीचा निर्णय; 'अशी' आहे, दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.