मुंबई: मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) ने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या उर्वरीत हंगामासाठी संघात डावखुरा वेगवान गोलंदाज टायमल मिल्सच्या ( Fast bowler Tymal Mills ) जागी दक्षिण आफ्रिकेचा युवा खेळाडू ट्रिस्टन स्टब्सचा समावेश केला आहे. दुखापतीमुळे मिल्स ( Tymal Mills injured ) उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
ट्रिस्टन स्टब्स हा दक्षिण आफ्रिकेचा 21 वर्षीय युवा यष्टिरक्षक ( Young wicketkeeper Tristan Stubbs ) आहे. त्याने 17 टी-20 सामने खेळले आहेत आणि 157.14 च्या स्ट्राइक रेटने तीन अर्धशतकांसह 506 धावा केल्या आहेत. तो 20 लाख रुपयात मुंबई संघात दाखल होण्यास तयार झाला आहे.
-
Squad Update: Tristan Stubbs to replace Tymal Mills in #MumbaiIndians 2022 squad.#OneFamily #DilKholKe pic.twitter.com/kwSkrpvMct
— Mumbai Indians (@mipaltan) May 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Squad Update: Tristan Stubbs to replace Tymal Mills in #MumbaiIndians 2022 squad.#OneFamily #DilKholKe pic.twitter.com/kwSkrpvMct
— Mumbai Indians (@mipaltan) May 5, 2022Squad Update: Tristan Stubbs to replace Tymal Mills in #MumbaiIndians 2022 squad.#OneFamily #DilKholKe pic.twitter.com/kwSkrpvMct
— Mumbai Indians (@mipaltan) May 5, 2022
21 वर्षीय प्रतिभावान ट्रिस्टन स्टब्स मधल्या फळीतील फलंदाजाने अलीकडेच झिम्बाब्वे विरुद्ध राष्ट्रीय दक्षिण आफ्रिका अ संघाकडून पदार्पण केले. ट्रिस्टनचा देशांतर्गत हंगाम आश्वासक होता आणि त्याने नुकत्याच संपलेल्या टी-20 देशांतर्गत लीगमध्ये त्याच्या संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. ट्रिस्टन उर्वरित हंगामासाठी एमआय संघात लवकरच सामील होईल.
मिल्सने आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी पाच सामन्यांत सहा विकेट घेतल्या आहेत. टायमल मिल्सच्या जागी मुंबई इंडियन्सने दक्षिण आफ्रिकेच्या ट्रिस्टन स्टब्सला संधी दिली आहे, असे एमआयने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मिल्स जखमी झाल्याने तो उर्वरित आयपीएलमधून बाहेर पडला आहे. आयपीएलच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्धीपत्रकानुसार, तो 20 लाख रुपये किमतीत मुंबई संघात सामील होईल.
-
Wishing our speedster Tymal Mills a rapid recovery 👊#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @tmills15 pic.twitter.com/c9w8ksK3GA
— Mumbai Indians (@mipaltan) May 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Wishing our speedster Tymal Mills a rapid recovery 👊#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @tmills15 pic.twitter.com/c9w8ksK3GA
— Mumbai Indians (@mipaltan) May 5, 2022Wishing our speedster Tymal Mills a rapid recovery 👊#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @tmills15 pic.twitter.com/c9w8ksK3GA
— Mumbai Indians (@mipaltan) May 5, 2022
मुंबई इंडियन्सचा संघ -रोहित शर्मा, इशान किशन, जसप्रीत बुमराह, किरॉन पोलार्ड, डेवाल्ड ब्रेविस, मुरुगन अश्विन, तुलसी थंपी, टिळक वर्मा, संजय यादव, डॅनियल सॅम्स, जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, टिम डेव्हिड, रिले मेरेडिथ, मोहम्मद. अर्शद खान, अनमोलप्रीत सिंग, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, हृतिक शोकीन, अर्जुन तेंडुलकर, आर्यन जुयाली, फॅबियन अॅलन आणि सूर्यकुमार यादव.
हेही वाचा - Ipl 2022 Csk Vs Rcb : चेन्नई आणि बंगळुरू सामन्या दरम्यानचा 'हा' व्हिडिओ होतोय व्हायरल