मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचा ( Fifteenth season of IPL ) बिगुल 26 मार्चला वाजला आहे. आतापर्यंत या स्पर्धेत प्रत्येक संघाचा एक सामना खेळला गेला आहे. तसेच आयपीएल स्पर्धेचा पाचवेळचा विजेता संघ मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात नेहमीप्रमाणे खराब झाली. ज्यात त्यांना आपल्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. परंतु आता याच मुंबई इंडियन्स संघासाठी आनंदाची बातमी ( Good news for Mumbai Indians ) समोर आली आहे. या संघाचा प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतीतून सावरला आहे. त्याचबरोबर तो मुंबई संघाशी जोडला गेला आहे.
-
Training day #1 of the new season for SKY ☀️#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @surya_14kumar pic.twitter.com/6Ax6s7u1bH
— Mumbai Indians (@mipaltan) March 31, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Training day #1 of the new season for SKY ☀️#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @surya_14kumar pic.twitter.com/6Ax6s7u1bH
— Mumbai Indians (@mipaltan) March 31, 2022Training day #1 of the new season for SKY ☀️#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @surya_14kumar pic.twitter.com/6Ax6s7u1bH
— Mumbai Indians (@mipaltan) March 31, 2022
सुर्यकुमार यादवचे संघात पुनरागमन -मुंबई इंडियन्स संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव ( Batsman Suryakumar Yadav ) बोटाच्या दुखापतीतून बरा झाल्यानंतर, अनिवार्य क्वारंटाइन कालावधी पूर्ण करुन संघाच्या बायो-बबलमध्ये सामील झाला आहे. यादवने बुधवारी मुंबई इंडियन्सच्या इतर स्टार्ससह ताकद आणि कंडिशनिंग सत्रात भाग घेतला होता. आता तो शनिवारी (२ एप्रिल) डीवाय पाटील स्टेडियमवर ( DY Patil Stadium ) राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल. 20 फेब्रुवारी रोजी कोलकाता येथे वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी-20 सामन्यात क्षेत्ररक्षण करताना सूर्यकुमारला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याचे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन सुरू होते. आता तो नुकताच दुखापतीतून सावरला आहे.
-
When 𝐁💥💥𝐌 and 𝑺𝒍𝒊𝒏𝒈𝒂 unite, 𝑺𝑲𝒀 is the limit ☀️💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @ninety9sl @Jaspritbumrah93 @surya_14kumar pic.twitter.com/CZlfkioPgj
— Mumbai Indians (@mipaltan) March 31, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">When 𝐁💥💥𝐌 and 𝑺𝒍𝒊𝒏𝒈𝒂 unite, 𝑺𝑲𝒀 is the limit ☀️💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @ninety9sl @Jaspritbumrah93 @surya_14kumar pic.twitter.com/CZlfkioPgj
— Mumbai Indians (@mipaltan) March 31, 2022When 𝐁💥💥𝐌 and 𝑺𝒍𝒊𝒏𝒈𝒂 unite, 𝑺𝑲𝒀 is the limit ☀️💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @ninety9sl @Jaspritbumrah93 @surya_14kumar pic.twitter.com/CZlfkioPgj
— Mumbai Indians (@mipaltan) March 31, 2022
मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीची निवेदन - मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीने ( Mumbai Indians franchise statement ) गुरुवारी जारी केलेल्या एका निवेदनात सांगितले की, सूर्यकुमार यादव त्याचे अनिवार्य क्वारंटाइन पूर्ण करुन बाहेर पडला आहे. तो आणि त्याचे सहकारी किरॉन पोलार्ड, इशान किशन आणि जसप्रीत बुमराह यांनी जिम सत्रांसाठी संघात उपस्थिती दर्शवली होते. पॉल चॅपमनच्या देखरेखीखाली संघाने बुधवारी स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग सत्र केले. या सत्रात वजन आणि फिटनेस प्रशिक्षणाचा समावेश होता, ज्यात मुख्य फिटनेसवर काम करण्यावर भर देण्यात आला होता.
यादवच्या अनुपस्थिती मुंबईचा पराभव -यादवच्या अनुपस्थितीत दिल्ली विरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीला ( Mumbai Indians middle order ), सलामीवीर रोहित शर्मा (41) आणि ईशान किशन (81) यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. ज्यांनी दिल्लीविरुद्ध चार विकेट्सने झालेल्या पराभवात, पहिल्या विकेट्साठी 67 धावा केल्या होत्या. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी कराताना 177/5 धावा केल्या होत्या, ज्याचा दिल्लीने 18.2 षटकांत यशस्वी पाठलाग केला. यादवने शनिवारी रॉयल्सविरुद्ध संघात पुनरागमन केले की, मधल्या फळीतील तिलक वर्मा आणि किरॉन पोलार्ड यांच्यावरील दडपण थोडे कमी होईल.