मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 28 वा सामना डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Punjab Kings vs Sunrisers Hyderabad ) संघात दुपारी साडेतीन वाजता सुरु होईल. तत्पुर्वी दोन्ही संघात नाणेफेकीचा कार्यक्रम पार पडला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार केन विल्यमसनने ( Captain Ken Williamson ) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पंजाब किंग्ज संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले आहे. आज मयंक अग्रवाल ऐवजी शिखर धवन ( Shikhar Dhawan ) नाणेफीकीसाठी आला होता. कारण मयंक अग्रवाल दुखापतीमुळे आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नाही.
-
#SRH have won the toss and they will bowl first against #PBKS.
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/WC7JjTqlLB #PBKSvSRH #TATAIPL pic.twitter.com/RjoZ8w6KEL
">#SRH have won the toss and they will bowl first against #PBKS.
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2022
Live - https://t.co/WC7JjTqlLB #PBKSvSRH #TATAIPL pic.twitter.com/RjoZ8w6KEL#SRH have won the toss and they will bowl first against #PBKS.
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2022
Live - https://t.co/WC7JjTqlLB #PBKSvSRH #TATAIPL pic.twitter.com/RjoZ8w6KEL
पंजाब किंग्ज संघाने ( Punjab Kings Team ) आतापर्यंत आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात विजय तर दोन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. तसेच हा संघ सहा गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानी विराजमान आहे. दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad Team ) संघाने देखील आपले पाच सामने खेळले आहेत. ज्यामध्ये पहिल्या दोन सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर संघाने विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली आहे. त्यामुळे हा संघ सातव्या स्थानी आहे.
-
The 1️⃣1️⃣ #Risers to take the field, looking for our 4️⃣th consecutive win! 🧡#PBKSvSRH #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/Uz4Fq1MJ5P
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The 1️⃣1️⃣ #Risers to take the field, looking for our 4️⃣th consecutive win! 🧡#PBKSvSRH #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/Uz4Fq1MJ5P
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 17, 2022The 1️⃣1️⃣ #Risers to take the field, looking for our 4️⃣th consecutive win! 🧡#PBKSvSRH #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/Uz4Fq1MJ5P
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 17, 2022
पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद मधील आकडेवारी -
1. हेड हू हेड स्टॅट्समध्ये सनरायझर्स हैदराबादचा पंजाब किंग्जविरुद्ध वरचष्मा राहिला आहे. आतापर्यंत हैदराबादने 18 सामने जिंकले आहेत, तर पंजाबने 6 सामने जिंकले आहेत.
2. डेव्हिड वॉर्नरने पंजाब किंग्जविरुद्ध 945 धावा केल्या आहेत. मात्र, या मोसमात तो सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग नाही. तो दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे.
3. शिखर धवनने हैदराबादविरुद्धच्या आठ सामन्यांमध्ये 28 च्या सरासरीने 218 धावा केल्या आहेत. त्याने आपल्या जुन्या संघाविरुद्ध अर्धशतक झळकावले असून त्याची सर्वोच्च धावसंख्या 78 आहे.
4. भुवनेश्वर कुमारने आतापर्यंत पंजाबविरुद्ध खेळल्या गेलेल्या 16 सामन्यांमध्ये 18.43 च्या सरासरीने 23 बळी घेतले आहेत आणि या संघाविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा तो पाचवा गोलंदाज आहे.
5. पंजाब किंग्जच्या सध्याच्या गोलंदाजांपैकी कागिसो रबाडाने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 14 विकेट घेतल्या आहेत.
-
"Mayank injured his toe while training yesterday!" - Shikhar Dhawan, who is leading the #PBKS today.
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A look at the Playing XI for the two teams.#PBKSvSRH #TATAIPL pic.twitter.com/ZBzsnlZPcw
">"Mayank injured his toe while training yesterday!" - Shikhar Dhawan, who is leading the #PBKS today.
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2022
A look at the Playing XI for the two teams.#PBKSvSRH #TATAIPL pic.twitter.com/ZBzsnlZPcw"Mayank injured his toe while training yesterday!" - Shikhar Dhawan, who is leading the #PBKS today.
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2022
A look at the Playing XI for the two teams.#PBKSvSRH #TATAIPL pic.twitter.com/ZBzsnlZPcw
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंग, जगदीशा सुचिथ, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅनसेन, उमरान मलिक आणि टी नटराजन.
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा आणि अर्शदीप सिंग.
हेही वाचा - RCB Vs DC, IPL 2022 : दिनेश कार्तिकची फटकेबाजी! 'RCB'कडून दिल्लीचा पराभव